भारतीय माणसाचा जीव वाचवणाऱ्या या तरुणाच्या धाडसाची कहाणी!!

अमेरिकेत राहणाऱ्या ‘इयान ग्रिल्लोट’ या माणसाचा खास सत्कार टाईम्स मॅग्झीनने केला आहे. त्याच्या या सत्कारामागील कारण होतं,  त्याने जीवावर उदार होऊन वाचवलेला एका भारतीयाचा जीव. टाईम्सच्या “5 Heroes Who Gave Us Hope in 2017.” या यादीत इयानचं नाव आहे. चला जाणून घेऊया त्याने केलेल्या या कामगिरी बद्दल!!

अमेरिकेतल्या कॅन्ससमध्ये एका माजी नौसैनिकाने २ भारतीयांना रेस्टॉरंटमध्ये बसलेले असताना हटकलं आणि त्यांना म्हटलं की "माझ्या देशातून चालते व्हा!".  यानंतर त्या माणसाने बंदूक काढून त्यातील ‘श्रीनिवास कुच्चीभोटला’ या भारतीयावर गोळी झाडली आणि त्याला जागीच ठार केलं. त्याच्याबरोबर असलेला अलोक मादसानी या दुसऱ्या भारतीयावर गोळी झाडली जाणार असतानाच ‘इयान ग्रिलोट’ या तरुणाने त्यात हस्तक्षेप केला. या झटापटीत इयानच्या छातीत गोळी लागली आणि तो जागीच कोसळला!!

इयानने याबद्दल म्हटलंय की, "मी जर त्यावेळी काही केलं नसतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो."

सुदैवाने इयानचा जीव वाचला आहे. त्याला इंडिअन-अमेरिकन संस्थेतर्फे ‘एक खरा अमेरिकन’ हा किताब देखील देण्यात आलाय. त्याच्या या धाडसाचं जगभरात कौतुक होत आहे. माणुसकी जिवंत असल्याचं हे अगदी ताजं उदाहरण म्हणावं लागेल !!

 

आणखी वाचा :

लैंगिक अत्याचाराविरुद्ध लढणाऱ्या ५ रणरागिणी...पण हा सहावा हात कोणाचा आहे ?

सबस्क्राईब करा

* indicates required