f
computer

उन्हाळ्यात कार थंड करण्याचे ५ उपाय !!

मंडळी, जसा मे महिना संपलाय तसा उकाडा आणखीनच वाढलाय नाही का? पण ह्या वाढत्या उकाड्याबरोबर एक प्रॉब्लेम सीरियस होत चाललाय. नाही नाही, ग्लोबल वॉर्मिंगबद्दल नाही हो. तो प्रॉब्लेम म्हणजे गाडी तापणे. अनेकदा तर आपल्याला कळतच नाही की आपण गाडीत बसलोय की एखाद्या भट्टीत!!! त्यामुळे तुम्हाला ह्या प्रॉब्लेममधून सोडवण्यासाठी बोभाटाची टीम घेऊन आलीये भन्नाट टिप्स!!! पाहूया आजच्या लेखात....

१) सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमची गाडी जर उन्हात उभी असेल, तर गाडीतल्या सीट्स कापडाने झाकून ठेवा. यामुळे सीट्स थंड राहण्यास मदत होईल. तसंच स्टिअरिंग व्हीलपण कापडाने झाका.

२) गाडीत शिरल्याशिरल्या लगेच एसी फुल स्पीडवर चालू करणं टाळा. प्रत्येक गाडीत एसीसाठी दोन मोड्स असतात: फ्रेश एअर मोड (Fresh air Mode) आणि रीसर्क्युलेशन मोड (Recirculation Mode). गाडीत बसल्यावर पहिले फ्रेश एअर मोड (Fresh air Mode) ऑन करावा आणि ५ मिनिटं खिडक्या उघड्या ठेवाव्यात. परिणामी ताजी हवा आत येते आणि गाडीतलं तापमान कमी करायला मदत करते. यानंतर मग एसी चालू करावा.

३) मोठ्या एसयूव्ही गाड्यांमधे त्यांच्या आकारामुळे कितीही पॉवरफुल एसी पटकन कूलिंग करण्यास निष्प्रभ ठरतो. ह्यावर उपाय म्हणून पडदे किंवा पारदर्शक प्लास्टिकच्या शीट्स पडद्यासारख्या लावाव्यात. म्हणजे उन्हापासून तर बचाव होतोच आणि जागा कमी झाल्याने कूलिंगही लवकर होतं.

४) आणखी एक प्रभावी उपाय म्हणजे गाडीच्या काचा नेहमी एक इंच उघड्या ठेवाव्यात, म्हणजे गाडीत हवा खेळती राहते. फक्त हा प्रयोग जरा जपून बरं का!!!

५. गाडी पटकन थंड करायची असेल, तर एका बाजूचे दार पूर्ण उघडा, आणि दुसरं दार दोनतीन वेळा पूर्ण उघडून जोरात बंद करा, त्यामुळं होईल काय, गरम हवा दुसऱ्या दारातून बाहेर फेकली जाईल. त्याहूनही जास्त हुकुमी उपाय म्हणजे गाडीचे चारही दरवाजे उघडून ठेवा आणि डिकीचे दार पूर्ण उघडून जोरात लावा. चारही दरवाजांमधून गरम हवा पटकन बाहेर पडेल. फक्त हा प्रकार सेदान गाड्यांना करता येणार नाही कारण डिकीचा दरवाजा आणि गाडीचा आतला भाग यांचा संबंध येत नाही.

६. मोठी गाडी असेल तर एसीचं कुलिंग व्हायला बराच वेळ लागतो. त्यासाठी गाडीत पार्टिशन टाकता येतं. हवं तेव्हा ते सरकवून काढताही येतं.

७. उन्हाळ्यात गाडीचं एकदा तरी सर्व्हिसिंग व्हायलाच हवं. सर्व्हिसिंग केलं तरंच आपली गाडी आपल्याला उन्हाळ्याभर साथ देण्यास तयार राहील. याशिवाय तुम्ही रेन वायसर, सनरूफ इ. ॲक्सेसरीज वापरूनसुद्धा तुमची गाडी कूल ठेऊ शकता.

आमच्या ह्या टिप्स आजमावून पहा आणि कशा वाटल्या हे जरूर कळवा!!

 

लेखक : प्रथमेश बिवलकर

सबस्क्राईब करा

* indicates required