computer

भारतातील ५ टॉपचे चोर बाजार !!!

ये येडे चोर बाजार मे क्या नही मिलता बता....एक ताजमहाल छोडके सबकुछ मिलता मालूम...!!!

ब्रँडेड चप्पलांपासून ते थेट महागडे गॅजेट्स आणि टकाटक नवीन कार पर्यंत सगळं मिळतं इथे. फक्त तुम्हाला काय पाहिजे ते बोला !! इथे चोरीचा माल घेतलाही जातो आणि विकलाही जातो.

तुम्हाला महागडी वस्तू हवी तेही कमी किमतीत 'फिर आओ, कुछ दिन तो गुजारो चोर बाजार मे' !!! एक खबरदारी मात्र घ्याच. इथे जात असाल तर आपली गाडी घेऊन जाऊ नका कारण थोड्याच वेळात तुमचीच गाडी तुमच्याच डोळ्या समोर विकली जाऊ शकते.

पण हे चोर बाजार आहेत तरी कुठे....चला जाणून घेऊया !!!

चला तर मंडळी आज भारतातल्या टॉपच्या चोर बाजारची सैर करू !!!

१. मटन स्ट्रीट, मुंबई

सर्व चोर बाजारचा ‘पप्पा’ म्हणजे मटन स्ट्रीटवाला चोर बाजार. इथे दुकानदार आपला माल ओरडून ओरडून विकतात म्हणून या बाजारला ‘शोर बाजार’ म्हणायचे. ब्रिटिश हे नाव उच्चारताना त्याला चोर बाजार म्हणत आणि इथूनच शोर बाजारला चोर बाजार म्हटलं जाऊ लागलं. खर तर हे नाव या बाजारला अगदी परफेक्ट बसलं.

हा चोर बाजार दक्षिण मुंबईत असून १५० वर्ष जुना आहे. सकाळी ११ पासून ते संध्याकाळी ७.३० पर्यंत इथे चोरांची आणि ग्राहकांची धावपळ सुरु असते.

तुमचं सामान कधी चोरीला गेलं असेल आणि ते इथल्या बाजारात मिळालं तर नवल वाटून घेऊ नका कारण इथले चोर हात की सफाई मध्ये माहीर आहेत.

२. दिल्ली चोर बाजार !

दिलीच चोर बाजार जगात सर्वात जुना चोर बाजार आहे. एकेकाळी हा बाजार रविवारचा बाजार म्हणून लाल किल्याच्या पाठच्या भागात भरत असे. आता हा बाजार दर्यागंज आणि जमा मस्जिद जवळ लागतो.

इथल्या सर्व गोष्टी एक तर चोरीच्या आहेत किंवा सेकंड हॅड. अगदी कमी किमतीत आणि दुर्मिळ प्रकारच्या वस्तू इथे सर्रास मिळतील. मुंबई चोर बाजार पेक्षा हा बाजार थोडा वेगळा आहे.

३. सोतीगंज, मेरठ, युपी !

तुम्हाला तुमची बाईक, कार तुमच्या बायको पेक्षा जास्त आवडते का ? उत्तर जर ‘हो’ असेल तर सोतीगंज मार्केट फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच उघडं आहे. चोरीच्या गाड्या स्पेर पार्ट्सचा इथे खजिना आहे मंडळी. मारुती पासून रोल्स रॉयल्स असे सर्व ब्रॅड इथे मिळतील.

इथली एक खास गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला सैन्यातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या जीप अगदी स्वस्थ दारात मिळतील. स्वस्थ म्हणजे अगदी ३०,००० पर्यंत.

४. चेकपेट मार्केट, बंगळूर

हा चोर बाजार तेवढा फेमस नसला तरी इथे दिल्ली आणि मुंबईच्या चोर बाजारात मिळणारं सर्व काही मिळेल. ग्रामोफोन, चोरीचे गॅजेट्स, कॅमेरा, एंटीक वस्तू, इलेक्ट्रॉनिकचे सामान आणि स्वस्थ जिम इक्विपमेंट. जर का तुमच्यात भाव करण्याची कला आहे तर मग लय भारी. हा बाजार तुमचाच !!!

५. पुदुपेट्टई, चेन्नई

पुदुपेट्टई चोर बाजार हा ‘ऑटो नगर’ म्हणून ओळखला जातो कारण इथली माणसं कारचे अस्सल पार्ट्स बदलण्यात आणि संपूर्ण कारचा कायापालट करण्यात पीएचडी करून बसलेले आहेत. कारचे स्पेर पार्ट्स तसेच कार बदलण्याचे समान इथल्या हजारोने असलेल्या दुकानात एका झटक्यात मिळतील.

हा बाजार अगदी हुबेहूब बॉलीवूड मधल्या ‘मसाला मारके’ टाईप चोर बाजार सारखा आहे. इथेही अनेकदा पोलिसांनी रेड टाकली पण असल्या रेड मुळे बंद होईल तो चोर बाजार कसला !!!

 

 

तर एवढी सगळी ‘इत्थंभूत’ माहिती दिल्यानंतर वाट कसली बघताय...

चलो चोर बाजार !!!

सबस्क्राईब करा

* indicates required