तुम्हाला गणपतीची ही आरती माहीत आहे का?

Subscribe to Bobhata

‌गणपती उत्सवातल्या आरत्या हा आपल्या मराठी संस्कृतीचा  जुना ठेवा आहे. वर्षभर विस्मरणात गेलेल्या आरत्या पुन्हा एकदा ताज्या होतात. या आरत्यांचे एक वैशिष्टय आहे बरं.. काही घरात फक्त गणपतीच्या आरत्या म्हटल्या जातात, तर काही घरात सुखकर्तापासून सुरुवात होते आणि दशावताराच्या आरतीपर्यंत सगळ्या आरत्या म्हटल्या जातात. काही घरात आरत्या म्हटल्या जात नाहीत तर गायल्या जातात, ते ही अगदी साग्र संगीत!  हार्मोनियम-तबला-झांजा-टाळ-पखवाज-चिपळ्यासकट!

काही घरात या प्रसंगी ठेवणीतल्या आरत्या ऐकायला मिळतात.

आज आम्ही अशीच एक ठेवणीतली आरती तुम्हाला ऐकवणार आहोत. ‌या आरतीला एक ऐतिहासिक संदर्भ आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केल्यावर मनोरंजनाचे सांस्कृतिक कार्यक्रम सुरु झाले. या कार्यक्रमाला मेळे म्हणायचे. या मेळ्यातली काही पदे आरतीच्या स्वरूपात घराघरांत पोहचली. आज तुम्हाला जी आरती ऐकवणार आहोत तीचा ताल -लय आणि धून Band पथकाची आहे.  ही आरती आणखी एका आरतीनंतर समाप्तीची आरती म्हणून गायली जाते.

 

दे दे दे दे, दे श्री गणपती

आम्हा दीना, दीना सन्मती

भितीस भ्रांतीस, निरसूनीया

गणपती, सुख अती, मज मती

दे दे दे .......

नाश करोनी विघ्नांचा

सन्मती देई, तू सकला

गणपती, सुख अती,मज मती

दे दे दे .....

सबस्क्राईब करा

* indicates required