computer

महाराष्ट्राच्या वैदेही डोंगरेने मिस इंडिया यूएसए स्पर्धेत बाजी मारली आहे? वैदेही डोंगरे आणि या स्पर्धेविषयी सविस्तर वाचा!!

भारतीय लोक देशात तर आपल्या कामाची छाप सोडतात आणि ते परदेशातही विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करतात. शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, राजकारणात अनेक मोठ्या पदांवर भारतीय लोक उत्तम कामगिरी करत भारताची मान उंचावतात. यात भारतीय मुलीही अजिबात मागे नाहीत. अमेरिकेत अंतराळात जाण्यापासून ते सौंदर्यस्पर्धा जिंकत या तरुण मुली सर्व जगाचे लक्ष वेधून घेत आहेत. नुकतेच ६० स्पर्धकांना मागे टाकत मिशिगनच्या वैदेही डोंगरेने  मिस इंडिया यूएसए विजेतेपद जिंकले आहे.  वैदेहीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

मिशिगनच्या २५ वर्षीय वैदेही डोंगरे हीने ‘मिस इंडिया यूएसए  (Miss India USA २१) चे विजेतेपद पटकावले आहे.

वैदेहीने मिशिगनमधून पदवी प्राप्त केली आहे. ती एका मोठ्या कंपनीत बिजिनेस डेव्हलपर म्हणून काम करते. वैदेहीने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे, तर जॉर्जियाच्या अर्शी लालानीने स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला दिला. वैदेही उत्तम नर्तकी देखील आहे. ती खूप चांगले कथ्थक करते. उत्कृष्ट कथ्थक सादरीकरणाबद्दल तिला ‘मिस टॅलेन्टेड’ हा मान ही  मिळाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या अर्शीबद्दल बोलायचे तर, तिने तिच्या अभिनयाने आणि आत्मविश्वासाने सर्वांना चकित केले आहे. तिने ब्रेन ट्यूमरसारख्या जीवघेण्या आजाराशी संघर्ष केला आहे. सेकंड रनर अप म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर उत्तर कॅरोलिनाच्या मीरा कसारी हिने बाजी मारली आहे.

मिस वर्ल्ड  डायना हेडन(१९९७) ही या स्पर्धेची मुख्य जज होती. यात तीन वेगवेगळ्या स्पर्धा होत्या.  ‘मिस इंडिया यूएसए’, ‘मिसेस इंडिया यूएसए’ आणि ‘मिस टीन इंडिया यूएसए’. त्यासाठी  ३ राज्यांतील ६१ स्पर्धकांनी भाग घेतला होता. या तीनही स्पर्धेच्या विजेत्यांना जागतिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी मुंबईला जाण्यासाठी तिकिटे देण्यात आली होती.

'मिस इंडिया यूएसए’ ही भारताबाहेर चालणारी भारतीय स्पर्धा आहे. ही ४० वर्षांपासून सुरू आहे. सुमारे ४० वर्षांंपूर्वी सुप्रसिद्ध भारतीय-अमेरिकन धर्मात्मा सरन आणि नीलम सरन यांच्या वर्ल्डवाईड पिजंट अंतर्गत न्यूयॉर्कमध्ये या स्पर्धेची सुरूवात झाली होती. यात दरवर्षी सौंदर्यवती सहभागी होतात.

वैदेही स्पर्धा जिंकल्याने खूप आनंदात आहे. तिने खूप मेहनत घेऊन  स्वप्न पूर्ण केल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिला भविष्यात  समाजासाठी काम करायचे आहे. महिलांच्या साक्षरतेसाठी आणि त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी अनेक उपक्रम करायचे आहेत. वैदेहीला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required