दिनविशेष: वास्को द गामा हा समुद्र मार्गाने भारतात पोहचणारा पहिला युरोपियन बनला, जाणुन घेऊया काही फॅक्टस
२० मे १४९८ला वास्को-द-गामा हा समुद्र मार्गाने भारतात पोहचणारा पहिला युरोपियन बनला. त्या निमित्ताने जाणून घेऊयात वास्को-द-गामाबद्दलच्या काही फॅक्टस...
- वास्कोच्या जन्मतारखेबद्दल इतिहास अभ्यासकांत मतभेद आहेत. त्याचा जन्म साइन्स पोर्तुगाल इथे झाला तर मृत्यू १५२४मध्ये भारतात कोची येथे झाला.
- वास्को-द-गामाच्या आधी अनेक खलाशांनी समुद्रमार्गे भारतापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला होता.
- त्याने ८ जुलै १४९७ला पोर्तुगाल सोडले तेव्हा त्याच्या सोबत ४ बोटी आणि १७० माणसे होती.
- वास्को-द-गामासोबत या प्रवासात ३ दुभाषी होते. २० मे १४९८ला तो भारतातल्या कालिकत बंदरावर पोहचला.
- या नंतरही वास्को-द-गामाने भारताच्या दोन मोहीमा केल्या.
- कालिकतमध्ये असताना त्याने भारतातून मुस्लिमांना हद्दपार करायची मागणी केली होती पण स्थानिक राज्यकर्त्यांनी ती नाकारली.
- १५२४मध्ये वास्कोला भारताचा पोर्तुगीज व्हाईसरॉय घोषित करण्यात आले पण ह्या पदाचा स्वीकार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.




