व्हिडीओ: ताडोबाच्या जंगलात जेव्हा एक अस्वली आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी वाघाचा सामना करते..

मित्रांनो, जेव्हा आम्ही जंगल सफरीला जातो तेव्हा आम्हांला वाघ दिसणे तर दूरच,  पण हरिणावरच समाधान मानावे लागते. पण बुधवारी दुपारी ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पामध्ये सफरीला गेलेल्या काही टुरिस्ट लोकांना एक भलताच अनुभव मिळाला. त्यांना चक्क एका अस्वलीची आणि वाघाची फाईट पाहायला मिळाली.

या लोकांनी अर्थातच त्याचा व्हिडीओ केला नाही असं २०१८ मध्ये होणं तर शक्य नाही. तर मंडळी,  हा व्हिडीओ दोन दिवस झाले व्हायरल होतोय. बांबू फॉरेस्ट सफारी लॉजच्या अक्षय कुमार यांनी हा व्हडिओ शेअर केलाय.

व्हीडीओच्या सुरवातीला ७ वर्ष वय असलेला मटकासुर वाघ एका अस्वलीला हुसकावून लावतोय, पण अचानक ती वाघावर हल्ला करते. आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी तिने हा हल्ला केला आहे. वाघ तिला पकडून धरतो, ती सुटायचा खूप प्रयत्न करते. दोघांच्या या लढाईत काय घडते ते आता आम्ही सांगत बसण्यापेक्षा तुम्ही व्हिडीओ पाहाच.