computer

झुमरी तलैय्या,गांव खरं की खोटं हे तर वाचाच, पण तिथं कसं जायचं तेही जरूर जाणून घ्या!!

झुमरीतलैया ऐकलं नसेल असा सिनेमाप्रेमी नसेल. अनेक बॉलिवूड सिनेमांमध्येही हे नाव तुम्ही ऐकले असेल. पण नेमके हे शहर खरे आहे की काल्पनिक याबद्दल लोकांच्या मनात शंका आहे.आज हीच तुमची शंका आम्ही दूर करणार आहोत.

झुमरीतलैया हा झारखंड जिल्ह्यातल्या कोडरमा शहरातील दामोदर घाटीत असलेला एक भाग आहे. झुमरीतलैया प्रसिद्ध झाले त्यामागील गोष्ट पण रंजक आहे. एक काळ होता जेव्हा भारतात टीव्ही सर्वसामान्य घरात आलेला नव्हता. त्याकाळी रेडिओचे चाहते आपली गाण्यांची फर्माईश कळवायचे. अनेकांना तो काळ आठवला असेल.

तर यात सर्वात जास्त जर कुणाची फर्माईश यायची तर ती झुमरीतलैयाच्या लोकांची. येथील लोक चक्क कुणाची फर्माईशचे गाणे सर्वाधिक वेळा रेडिओवर येते याची स्पर्धा करायचे. इथे रेडिओप्रेमी जास्त प्रमाणात असतील, पण या कारणाने झुमरीतलैया देशभर प्रसिद्ध होण्यास मदत झाली. त्यात गावाचे नावही जगावेगळे असल्याने इथून पुढे या गावाचा उल्लेख अनेक ठिकाणी यायला लागला.

झुमरीतलैयाची लोकसंख्या जवळपास ७० हजार सांगितली जाते. कोडरमा या जिल्हा मुख्यालयाच्या नजीकच हे शहर आहे. नावामागे तलैया लागण्याची पण कहाणी आहे. दामोदर नदीला येणारा पूर रोखण्यासाठी तलैया नावाचा बांध बांधण्यात आला. हेच नाव झुमरीच्या मागे लागले. हे ठिकाण पिकनिक स्पॉट म्हणूनही प्रसिद्ध आहे.

या शहरातला कलाकंद प्रसिद्ध आहे. शहराचे जवळचे रेल्वेस्थानक हे कोडरमा हेच आहे. हा भाग दिल्ली-हावडा मार्गावर आहे. राजधानी एक्सप्रेससुद्धा या मार्गावरून जाते. कधी जाण्याची संधी मिळाली तर नक्की या शहराची सफर करा!!

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required