या आभासी चित्रात एकाच वेळेस १२ काळे ठिपके तुम्हाला दिसताहेत का? चक्कर येईल जास्त वेळ बघू नका..
या प्रकाराला Ninio’s extinction illusion असे म्हणतात. फ्रेंच सायंटिस्ट Jacque Ninio यांनी २००० साली पहिल्यांदा हे ऑप्टिकल इल्युजन तयार केले. त्यानंतर या रविवारी अचानक हे चित्र व्हायरल झाले आणि आत्तापर्यंत हे ११००० वेळा शेअर झाले आहे. एका वेळेस चार, फारतर आठ ठिपके तुम्हांला दिसू शकतात. पण एकाच वेळेस सगळे बारा ठिपके दिसणं खूप अवघड आहे. तुम्हांला दिसले का एका दमात १२ ठिपके?