५० रुपयाच्या नव्या नोटेचे फोटो झाले व्हायरल... खरे असतील का?

नोव्हेंबरमध्ये सरकारनं आपल्याला डीमोनेटायझेशन नावाचा शब्द शिकवला आणि त्या नंतर 200, 100, 1000 500, 2000 सगळ्याच नोटांचे वेगवेगळे फोटो नेटवर पसरले. पण आज चक्क 50 रुपयाच्या नोटेचा फोटो सगळीकडे फिरताना दिसतोय..


अजून रिझर्व्ह बँकेने या नोटांबद्दल ऑफिशियल घोषणा केली नाहीय, पण गेल्या वर्षी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी 50 रुपयाच्या नवीन डिझाईनच्या नोटा येणार असल्याचं जाहीर केलं होतं.  या सोबतच 20 रुपयांचीही नवीन नोट येणार असल्याची चर्चा आहे. नोटांच्या या नव्या डिझाईन सीरिजला महात्मा गांधी सीरिज-2005 असे म्हणतात. 


आता हो व्हायरल झालेला फोटो खरा आहे की खोटा हे अजून तरी कळणं शक्य नाहीय. तोवर आपण ह्यात असणाऱ्या चीप आणि इतर सेक्युरिटी फीचर्सचा शोध लावू...

सबस्क्राईब करा

* indicates required