computer

नुकतंच जन्मलेलं बाळ डॉक्टरचा मास्क ओढतंय? व्हायरल फोटोमागची गोष्ट तर जाणून घ्या!!

जगातील सर्वात जास्त कुतूहलाची गोष्ट कोणती आहे माहितेय? बाळाचा जन्म. मुलं ही देवाघरची फुलं मानली जातात आणि या नवजात बाळाने आपली सर्वांची इच्छाच जणू काही व्यक्त केली आहे.

इंटरनेटवर नुकत्या जन्मलेल्या बाळाचा एक फोटो व्हायरल होतोय. डॉक्टरांनी त्या बाळाला आपल्या हातात धरलंय. नुकतंच जन्मल्यामुळे बाळ रडतंय आणि एका हाताने डॉक्टरांचा मास्क काढण्याचा प्रयत्न करत आहे.

डॉ. समेर छेब हे UAE मध्ये स्त्रीरोगतज्ञ म्हणून काम करतात. त्यांच्या इन्स्टाग्रामवर त्यांनी डिलिव्हरी केलेल्या अनेक लहान बाळांचे फोटो उपलोड केले आहेत. हा फोटो ही त्यांनीच अपलोड केला होता. काही मिनिटांच्या आतच हा फोटो प्रचंड व्हायरल झालाय. ३८,६२८ लोकांनी ह्या फोटोला पसंती दाखवलीये तर १००० लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. डॉक्टरांनी ह्या फोटो खाली मजेशीर कॅप्शन लिहीले आहे की, “आपल्या सर्वाना असे संकेत हवे आहेत. लवकरच आपल्याला मास्क घालावे लागणार नाहीत.”

“एक अर्थपूर्ण आणि सुंदर फोटो “ अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे.

“ह्या लहान बाळाला खरच मास्क घालायला आवडत नाहीये” अशी मजेशीर प्रतिक्रियाही दिलीय तर आणखी एक युझर म्हणतात की,”नक्कीच ह्या बाळाला दूरदृष्टी मिळालीये, लवकरच कोरोनाच संकट जगातून निघून जाईल”.

 

अशा मजेशीर सुंदर प्रतिक्रीया मिळालेला हा गोंडस फोटो खरंच डोळ्यात भरण्यासारखा आहे. कोरोनामुळे आपण सर्वजण आपापल्या घरात कैदेत आहोत. काही कामासाठी बाहेर जायचे म्हंटले तर मास्क घालूनच जावं लागतं. ह्या गोंडस फोटोमुळे अनेक लोकांचा दिवस नक्कीच सुंदर आणि आशावादी गेला असणार ह्यात काही शंकाच नाही.

लेखिका : स्नेहल बंडगर

सबस्क्राईब करा

* indicates required