computer

दोन मधमाशांनी मिळून फँटाची बाटली उघडली? पाहाच इथे!!

तुम्हाला दोन वर्षांपूर्वी तुफान लोकप्रिय झालेले बॉटल कॅप चॅलेंज आठवतंय का? अनेक जणांनी त्याचे व्हिडीओ पाहिले असतील. बाटली न पाडता तिचे झाकण पायांनी गोल फिरत उघडणे. तेव्हा कितीतरी सेलिब्रिटीजनी आपापले व्हिडीओज तयार करून सोशल मिडीयावर पोस्ट केले होते. एक गंमत किंवा खेळ म्हणून जरा काही हटके करायचे आणि व्हायरल व्हायचे हा ट्रेंड आजकाल सगळीकडे दिसतो. असाच एक व्हिडिओ नुकताच ट्रेंड झालाय, पण यात बाटलीचे झाकण कोणी माणसाने नाही तर चक्क दोन मधमाश्यांनी उघडले आहे. तुम्हीही एकदा पाहून घ्याच.

ब्राझीलच्या साओ पाउलो येथून एका व्यक्तीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. दुपारचे जेवण करत असताना त्याने टेबलवर फँटाची बाटली ठेवली होती. तेवढ्यात दोन मधमाश्या आल्या आणि त्या बाटली भोवती फिरू लागल्या. त्या व्यक्तीने मधमाश्या काय करतात हे पाहण्यासाठी व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. मधमाश्या बाटलीचे झाकण उघडत होत्या आणि काही मिनिटांतच त्यांनी ते उघडले आणि खाली पाडले. 

हा व्हिडिओ नेटकऱ्यांना आश्चर्यचकित करून गेला. काहीजणांनी "मस्त टीमवर्क" अशी कॅप्शन दिली, तर काहीजण "मधमाश्यांची उत्क्रांती" असंही म्हणाले. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आणि अनेक गंमतीदार कमेंटमुळे व्हिडीओची हवा झाली.

तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला? कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा!

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required