computer

शनिवार स्पेशल : ठाण्यात भरलंय 'वृक्षवल्ली २०१८' प्रदर्शन!!

मंडळी ठाण्यात भरलं आहे फुलं, फळं आणि भाजीपाल्याचं भव्य प्रदर्शन ‘वृक्षवल्ली २०१८’. हे प्रदर्शन असणार आहे १२ जानेवारी ते १४ जानेवारीपर्यंत. देशविदेशातील अनेक प्रकारची झाडं तुम्हाला इथं पाहायला मिळतील. फुलांचे, फळांचे प्रकार तसंच अनेक प्रकारची झाडंसुद्धा इथे आहेत. हे संपूर्ण प्रदर्शन तुमच्या कॅमेऱ्यात मावणार नाही एवढं सुंदर आहे राव.

चला तर ‘वृक्षवल्ली २०१८’ बाबत आणखी जाणून घेऊ या.

वृक्षवल्ली २०१८ हे फक्त प्रदर्शन नाही बरं.. हे  ठाण्याला हरित ठाणे करण्याच्या दृष्टीने ‘ठाणे महानगरपालिकेने’ उचललेलं एक मोठं पाऊल आहे. झाडांची निगा आणि सुशोभीकरणास वाव मिळावा म्हणून प्रदर्शनाबरोबरच ‘बाग सुशोभीकरण व निगा’ ही स्पर्धा देखील भरवण्यात आली होती. स्पर्धेसाठी ३०० ठाणेकरांनी अर्ज भरले आहेत आणि उद्या म्हणजे १४ जानेवारी रोजी स्पर्धेचा निकाल लागणार आहे. 
या स्पर्धेत अनेक सोसायट्यांनी देखील भाग घेतला होता. पण लाखोंची जनसंख्या असलेल्या ठाण्यात स्पर्धेला मात्र काहीसा थंड प्रतिसाद मिळाला. स्पर्धेला जरी कमी प्रतिसाद असला तरी प्रदर्शनाला अनेकांनी हजेरी लावलेली दिसत आहे.

तर, हे भव्य प्रदर्शन तुम्हीही पाहू शकता. उद्या या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असेल. त्यामुळे आजच प्लॅन करा.


'वृक्षवल्ली २०१८'
पत्ता : रेमंड कंपनी मैदान, पोखरण रोड नं. 1, ठाणे (प)
 

चला तर मंडळी जाता जाता पाहूयात या कार्यक्रमातील काही अप्रतिम दृश्यं :

सबस्क्राईब करा

* indicates required