वॉल ऑफ काइंडनेस : देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे !

अन्न, वस्त्र, निवारा या अत्यंत आवश्यक व रोजच्या जीवनातील गोष्टींसाठी अनेकांना आजही झगडावं लागतं. रोजच्या मिळणाऱ्या कमाईवर त्यांना गुजराण करावी लागते. अशा गरीब व गरजूंना मदत करण्याची आपली इच्छा तर असते पण ती नेमकी कशी करायची हे काही आपल्याला ठाऊक नसतं. प्रत्येकाला पैश्यांच्या रुपात ही मदत करता येण्यासारखी असतेच असं नाही. त्यामुळे आपल्याकडील नको असलेली गोष्ट ज्याला त्याची खरी गरज आहे अश्या माणसापर्यंत पोहोचवणे हा देखील मदतीचा एक भाग असू शकतो.  याचा कल्पनेतून इराणमध्ये एका सामाजिक कार्याला सुरुवात झाली आणि आता ती भारतातही पसरत आहे. या संकल्पनेला ‘वॉल ऑफ काइंडनेस’ असं म्हणतात. 

चला तर मग जाणून  घेऊया या संकल्पनेविषयी.

 

वॉल ऑफ काइंडनेस म्हणजे काय ?

Image result for wall of kindnessस्रोत

वॉल ऑफ काइंडनेस म्हणजेच एक प्रकारे आपण त्याला ‘दयेची भिंत’ असं म्हणू शकतो. कपडे, खाण्याचे पदार्थ, बूट, चादर, पुस्तके, मासिक असं सर्व जे तुमच्याकडे देण्यासारखं आहे, ते तुम्ही या भिंतीजवळ ठेवू शकता. ज्यांना गरज आहे ते या भिंतीवरून त्यांना हवी ती वस्तू घेऊ शकतात आणि कोणीही त्यांना याबद्दल एकही प्रश्न विचारणार नाही.

Image result for wall of kindness in iranस्रोत

सार्वजनीक भिंतीचा वापर सामाजिक कार्यासाठी करण्याची कल्पना मूळची इराणची. पारसी भाषेत याला ‘दिवार-ए-मेहरबानी’ म्हटलं जातं. या कल्पनेच्या विस्तारानंतर यात अनेक गोष्टी उदाहरणार्थ, भिंतीला हँगर्स लावून त्यात कपडे अडकवणं,  भिंतीला रंगांनी, चित्रांनी सजवणं अशा सामील होत गेल्या. 

स्रोत

इराणनंतर आता भारतात ही संकल्पना पसरू लागली आहे. राजस्थान, भोपाल, दिल्ली अश्या ठिकाणी या भिंतीला ‘नेकी की दिवार’ म्हटलं जातं. जमेची बाजू म्हणजे संकल्पनेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतीच ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनने हैद्राबाद मध्ये वॉल ऑफ काइंडनेसला सुरुवात केली आहे.

स्रोत

कुणासमोर हात न पसरता मदत मिळणे, आणि आपण दान देत आहोत याचा अभिमान न बाळगता देत राहणे या दोन्ही गोष्टी यातून साध्य होताना दिसतायत.

शेवटी काय, तर देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे.

सबस्क्राईब करा

* indicates required