टिव्ही जगतातील काही गंमतीदार व्यत्यय...यातला शेवटचा तर आपल्या पाचवीलाच पुजलेला असतो...!!!

एके काळी म्हणजे ब्लॅक अँड व्हाइट दूरदर्शनच्या जमान्यात  सातच्या बातम्यामध्ये भक्ती बर्वे  बातम्या वाचताना त्यांना माशा सतत हैराण करत आणि  वाचताना त्यांना माशा हाकलण्यासाठी करावे लागणारे हातवारे हा विनोदी चर्चेचा भाग होता.

काल एका रशियन चॅनलवर बातम्या देणार्‍या बाईंची काही क्षण भंबेरी उडाली एका कुत्र्यामुळे.! झालं असं की त्यांच्या डेस्कखाली एक कुत्रा आराम करत होता आणि बातम्या वाचणार्‍या ताईंचा आवाज ऐकून त्यानी भुंकायला सुरुवात केली. काही सेकंदातच कॅमेरा समोर येऊन बातम्यांमध्ये एक मजेदार व्यत्यय आणला. आता हे आम्ही शब्दात सांगण्यापेक्षा तुम्हीच प्रत्यक्ष बघा ना ही धमाल !!!

असे अनेक अनाहूत पाहुणे अधून मधून गंमती जमती करत असतात. भारत विरुध्द इंग्लंडच्या विशाखापट्टणमच्या कसोटी सामन्यात एका भटक्या कुत्र्याने भाग घेऊन काही काळ व्यत्यय आणला होता.

कुत्र्यांना फक्त क्रिकेटच आवडतं असं नाही, त्यांना फुटबॉल पण आवडतो. ब्राझीलमधल्या एका सामन्यात खेळायला आलेल्या एका कुत्र्यानी काही काळ खेळाडूंचे मनोरंजन केले होते.

कुत्र्याचं सोडा राव..  पक्षी सुद्धा अजब करामती करतात. आता हेच बघा ना. टेनिसच्या सामन्यात एक पक्षी प्रेक्षक म्हणुन थेट मैदानात जाऊन पोहोचला.

सरप्राईज कुठेही कधीही मिळू शकतो हे आपल्याला खालील व्हिडीओ बघितल्यावर समजेल. हॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता 'टॉम हँक' एका लग्नाच्या फोटोशूट च्या वेळी तिथे जाऊन टपकला. दोघा जोडप्यांना बसलेला धक्का आपण साफ बघू शकतो पण डीस्टर्ब तो डीस्टर्ब होता हे ना बॉस.

मुलं म्हणजे देवा घरची फुलं असं आपण म्हणतो पण हिचं मुलं महत्वाच्या कामात व्यत्यय आणतात तेव्हा मोठ्यांची तारांबळ उडते...कशी ? व्हिडीओ बघा.

आता हे सर्व व्यत्यय कसेही असले तरी हवेहवेसे वाटणारेचं असतात. नाही का ?

सबस्क्राईब करा

* indicates required