बाजार गप्पा - कच्च्या तेलाच्या मंदीचा फायदा कुणाला ?

मराठीत एक वाक्प्रचार आहे "पंत मेले आणि राव चढले". याचा अर्थ असा़ की एकाचे नुकसान झाले ते म्हणून दुसर्‍याचे नशिब फळफळले. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव पडत आहेत. गेली २-३ वर्षे सतत मंदी असल्याचा फायदा अनेक कंपन्यांना होणार आहे. असे काही निवडक समभाग बघू या ज्यांना या मदीतून मोठा फायदा होणार आहे.

'अल्ट्राटेक सिमेंट'

Image result for ultratech cementस्रोत

श्री सिमेंट - एसीसी आणि मंगलम सिमेंट. बहुतेक सर्व सिमेंट कंपन्या इंधन म्हणून पेटकोक चा वापर करतात. कच्च्या तेलाचे शुध्दीकरण करताना डांबरासरखा पेट्रोल मिश्रीत काळा साका जमा होतो त्याला पेटकोक म्हणतात. पेट्कोक स्वस्त झाल्यामुळे सिमेंट कंपन्यांचा इंधन खर्च कमी होऊन नफ्याचे प्रमाण वाढेल. हे मत राकेश तारवे  रिसर्च हेड -रिलायन्स सिक्युरिटीज यांचे आहे.

 

'कानसाई नेरोलॅक'

ही कंपनी औद्योगीक क्षेत्रात लागणारे रंग आणि कोटींग तयार करते. कानसाई या जपानी कंपनीने अत्याधुनीक तंत्रज्ञानाची या कंपनीत भर टाकली आहे. रंगांसाठी लागणारा कच्चा माल स्वस्त झाल्यामुळे नफा वाढेल अगरवाल- एसएमसी इन्वेस्ट्मेण्ट्स अँड अ‍ॅदव्हायजर्स.

 

'बर्जर पेंट्स'

Related imageस्रोत

सुशोभीकरणासाठी लागणार्‍या रंगाचे उत्पादन करण्यात ही कंपनी अग्रेसर आहे. या कंपनीचा कच्चा माल म्हणजे टिटॅनीयम डाय ऑक्साईड आणि कच्चा खनीज तेला पासून निघणारे काही पदार्थ. पडत्या कच्च्या तेलाच्या भावाच फायदा या कंपनीला होईल असे मतजयंत मलीक -रेलीगेअर सिक्युरेटीज यांचे आहे.

‘नीलकमल प्लास्टिक’

प्लास्टिक उद्योगाचा कच्चा माल ऑईल रिफायनरीज मधून येतो. या वर्षी तेल उद्योगात मंदी असल्यामुळे या कंपनीचा नफा ८ ते १० टक्के वाढेल असा अंदाज ‘ए. के. प्रभाकर’ रिसर्च हेड आय.डी.बी.आय कॅपिटल यांनी वर्तवला आहे.

 

Image result for finolex pipesस्रोत

‘फिनोलेक्स इंडस्ट्रीज’ प्लास्टिक पाईप आणि फिटिंग्स तसेच PVC  Resins मध्ये मोठी मक्तेदारी असणाऱ्या कंपनीला देखील मंदीचा फायदा होणार आहे. त्यामुळे ए. के. प्रभाकर यांनी या कंपनीला Buy असे रेटिंग दिले आहे.

 

स्पष्टीकरण : बाजारातील वेगवेगळे अधिकृत सल्लागार काय सल्ला देत आहेत याची माहिती या लेखात दिली आहे शेअर बाजारात गुंतवणुक कशी करावी आणि उपदेश काय द्यावा यावर सेबीचे घट्ट नियम आणि निर्बंध आहेत. 'बोभाटा' या नियमानुसार स्वतःचे असे काही सल्ले देऊ शकत नाही.  गुंतवणूक करणे किंवा न करणे हा निर्णय प्रत्येकाने ज्याचा त्याचा घ्यायचा आहे. बोभाटा कोणतीही जबाबदारी स्विकारत नाही.

 

आणखी वाचा :

बाजार गप्पा - पाच निवडक समभाग !

 

सबस्क्राईब करा

* indicates required