computer

'इलेवन्थ अवर' हा वाक्यप्रचार चक्क बायबलमध्येही आहे? वाचा या वाक्यप्रचाराची सुरस उद्गमकथा!!

उद्या सकाळी ११ वाजता माझी महत्वाची मिटिंग आहे आणि तू आत्ता सांगतेयस की शाळेत पालक भेटीसाठी बोलावलंय? इलेवंथ अवरला कसं मॅनेज होणार सगळं? अशा प्रकारचा संवाद तुमच्याही घरात/ऑफिसमध्ये/फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही ऐकलाच असेल. हो ना? अचानक किंवा ऐनवेळी काही काम निघालं तर आपण म्हणतो, आत्ता इलेवंथ अवरला कसं शक्य आहे हे? आपल्यावर कामाची जबाबदारी ढकलणाऱ्यावर थोडी चीडचीडही होते. अपुऱ्या वेळेत जर एखादं मोठं जबाबदारीचं काम शिरावर पडलं तर मग काय विचारूच नका. इलेवंथ अवरला कामं लावणाऱ्या ऑफिस कलीग किंवा बॉसचा असा काही राग येतो की बस्स! कामाचं सोडा पण, ‘इलेवंथ अवर’ हा शब्द कसा आणि कुठून निर्माण झाला असेल? अगदी घाईघाईत ढकललेल्या जबाबदारीचं वर्णन करण्यासाठी ती शेवटची निकडीची वेळ दर्शवण्यासाठी किती अचूक शब्द आहे नाही हा? इलेवंथ अवर!

काही लोकांच्या मते हा वाक्यप्रचार दस्तूरखुद्द बायबलमध्येच वापरण्यात आला आहे. बायबलच्या मॅथ्यू २०:९ या विभागात “आणि ते आले तेव्हा अकरावा तास होता (इलेवंथ अवर) तरीही त्यांना आधीच्या कामगारा इतकेच दिनार मिळाले,” अशा अर्थाचं एक वचन आहे जिथे इलेवंथ अवर या वाक्यप्रचाराचा प्रयोग सापडतो. या वाक्यप्रचाराच्या संदर्भांनुसार अर्थ असा आहे की, कामाचा कालावधी बारा तासांचा असतानाही काही लोकांना अकराव्या तासात कामावर रुजू करून घेण्यात आले आणि असे असले तरी त्यांना आधीपासून काम करणाऱ्या (दिवसभर काम करणाऱ्या) कामगारांइतकाच पगार मिळाला.

इथे जरी इलेवंथ अवर हा वाक्यप्रचार वापरण्यात आला असला तरी, आज ज्या अर्थाने तो रूढ आहे, त्या अर्थाने वापरण्यात आलेला नाही, हे तर दिसतेच आहे. मग इलेवंथ अवरला आजचा अर्थ कधी आणि कसा चिकटला असावा?

या वाक्यप्रचार १९व्या शतकापासून रुळला असला तरी त्या आधीपासूनच तो वापरला जात होता. काही लोकांनी इलेवंथ अवरचा कालावधी कमी केला आणि संध्याकाळी ५ ते ६ यावेळेत आलेले काम दर्शवण्यासाठी ते या वाक्य्प्रचाराचा वापर करू लागले. कारण त्या काळात कामाची वेळ ही पहाटे ६ पासून ते संध्याकाळी ६ पर्यंत अशी होती. म्हणजेच सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत. बायबलमुळेच या वाक्य प्रचाराला आजचा अर्थ प्राप्त झाला किंवा नाही हे सांगता येत नसले तरी, आज मात्र तो ऐनवेळी अशाच अर्थाने वापरला जातो.

क्रीकपॅट्रिकच्या 'ओव्हर १५०० फ्रेजेस एक्सप्लोअर्ड अँड एक्सप्लेन्ड' या ग्रंथानुसार बायबलमध्ये हा वाक्यप्रचार फक्त वापरण्यात आला असला तरी त्याचा अर्थ आजच्या अर्थाशी मिळता जुळता नाही. बायबलमध्ये अकरावा तास या अर्थाने आलेल्या या वाक्यप्रचाराचा अर्थ काळाच्या ओघात संकुचित होत गेला आणि अगदी ऐनवेळी किंवा शेवटच्या क्षणी इथपर्यंत येऊन पोचला आहे.

बाकी इलेवंथ अवरला तुम्हाला कुणी जर महत्वाचं काम दिलंच तर तुमची प्रतिक्रिया कशी असते?

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required