f
computer

यातला तुमचा आवडता राष्ट्रगीताचा व्हिडिओ कोणता?

सध्या थेटरात राष्ट्रगीत वाजवावं की नाही या चर्चा चालू आहेत. मग कधी कुणी राष्ट्रगीत चालू असताना उभं राहातं, कुणी नाही यावरून पुन्हा खटले वगैरे चालू आहेत.

आपण सध्या त्याबद्दल नको बोलूयात. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट आणि १ मे अशा दिवशी देशभक्तीपर गाणी कानावर पडली की अंगात कसला उत्साह संचारतो!! राष्ट्रगीतानंही देशभक्तीची भावना मनात येतेच येते. थेटरात राष्ट्रगीत नुसतंच लावत नाहीत, तर त्यासोबत असतो एखादा व्हिडिओ, आपल्या देशाची महती गाणारा आणि देशप्रेमाचं स्फुल्लिंग चेतवणारा.

पाहा हे व्हिडिओ आणि सांगा तुमचा यातला आवडता व्हिडिओ कोणता ते!!

सियाचेन

हा व्हिडिओ आहे सियाचेनच्या रक्त गोठवून टाकणार्‍या थंडीतला. अशा प्रतिकूल हवामानातही आपले जवान भारताचा झेंडा फडकत ठेवतात हे पाहून ऊर अभिमानानं भरून येतो.

बोलकं राष्ट्रगीत

हे आहे सर्वात जिवंत आणि बोलकं राष्ट्रगीत. ’देशभक्ती की कोई भाषा नहीं होती’.. खरं ना?

मराठी राष्ट्रगीत

थोड्याथोडक्या नाही, तर तब्बल ७५ मराठी कलाकारांनी गायलेलं हे राष्ट्रगीत तुम्हाला सर्व मराठी कलाकारांची आठवण करून देईल. दुर्दैवाने त्यातले काहीजण आज हयात नाहीत, पण त्यांच्या स्मृती अशा व्हिडिओजच्या माध्यमातून आपल्यासोबत नेहमी असतील. नाही का?

गौरवगीत..

लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी या अधिकार्‍यानं एकट्यानं, कोणत्याही मदतीविना आणि कुठेही न थांबता पृथ्वीला समुद्रप्रदक्षिणा घातली. हा पराक्रम करणारे हे आशियातले दुसरे तर जगातले ७९वी व्यक्ती आहेत. या समुद्रसफरीच्या काळात २०१३ च्या प्रजासत्ताक दिनादिवशी म्हणजेच २६ जानेवारीला त्यांनी केप हॉर्नला वळसा घातला. केप हॉर्न म्हणजे समुद्रसफरीतलं माऊंट एव्हरेस्ट मानलं जातं आणि हे ठिकाण भारतापासून दक्षिण दिशेला असलेलं शेवटचं ठाणं आहे. तर कमांडर अभिलाष यांनी इथं भारताचा झेंडा फडकवून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला. 

२६/११ च्या शहीदांना श्रध्दांजली

२६/११ ची जखम भारत कधीच विसरू शकणार नाही. अतिरेक्यांनी येऊन इथं अगदी मृत्यूचं थैमान घातलं. या दिवसाची आणि त्यादिवशी आपल्या प्राणांची पर्वा न करता या अतितेक्यांना सामोरे गेलेल्या सर्व लोकांना त्यांच्या विभागांच्या सहकार्‍यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

 

भारतीय खेळाडू- भारताची शान

हा भारतीय खेळाडूंचा व्हिडिओही तुम्हाला तितकाच आवडेल.

संगीतमय राष्ट्रगान

भारताला संगीताचं अपार देणं लाभलंय. अशाच कलाकारांचा हा व्हिडिओ..

संगीताची मैफिल

ही आणखी एक संगितिका..

मोठ्या आणि छोट्या पडद्यावरील स्त्रीकलाकार

सबस्क्राईब करा

* indicates required