लिफ्टमध्ये आरसा असण्यामागचं गुपित हे आहे बरं...

आपल्या आजूबाजूला अनेक अशा गोष्टी असतात ज्यांच्यामागे एक मोठा अर्थ लपलेला असतो.  पण त्या गोष्टींची आपल्याला इतकी सवय झालेली असते, की तिकडे सहसा आपलं लक्ष जात नाही. आता हेच बघा ना, लिफ्टमध्ये आरसा लागलेला असतो. पण तो तिथे का असतो? याबद्दल आपल्याला काहीच माहित नसतं. हाां, आता आपल्यातले काहीजण म्हणतील की, "लिफ्टमध्ये येणाऱ्याला आपल्या चेहरा पाहता यावा  म्हणून तो तिथे लागलेला असतो". हे खरं असलं तरी यापाठी एक वेगळं कारण देखील आहे राव...

चला तर, आज जाणून घेऊया लिफ्टमध्ये आरसा लावण्यामागे काय कारण असतं ते...

लिफ्टमध्ये शिरल्यानंतर आपण पाहिजे त्या मजल्यावर कधी पोहोचू हाच विचार आपल्या डोक्यात चालू असतो. या दरम्यान करायचं काय हा प्रश्न पडतोच. हल्ली सगळ्यांकडे स्मार्टफोन असल्याने ही चिंता मिटलेली आहे. पण हे सर्व ज्या काळात सुरु झालं त्यावेळी स्मार्टफोन वगैरे नव्हते. त्यामुळे लिफ्टमध्ये माणसांना वेळ घालवण्यासाठी हा आरसा तिथे लावला जायचा.

इतिहासात थोडंसं मागे जाऊया...

स्रोत

जगात सगळीकडेच लिफ्टमध्ये लावला जाणारा आरसा हा काही योगायोग वगैरे नाही. याची सुरुवात झाली दुसऱ्या महायुद्धानंतर. खरं तर लिफ्टचा शोध १८०० च्या काळातच लागला होता. पण महायुद्धानंतर टोलेजंग इमारतींची संख्या वाढली आणि इमारतीत ये-जा करण्यासाठी लिफ्टची मागणीही वाढली. त्याकाळात लोकांकडून लिफ्टच्या धीमेपणाबद्दल तक्रार केली जात होती. लिफ्टमधल्या वेळात लोकांचा धीर सुटत असे. त्यामुळे एक शक्कल लढवून तिथे एक कायमस्वरूपी आरसा लावण्यात आला. लोक या मधल्या काळात आरशात स्वतःला बघत किंवा केस नीट करत. आरशामुळे लोक गुंतून राहू लागले. हा उपाय चांगलाच कामी आला आणि लोकांच्या तक्रारी बंद झाल्या. पुढे जाऊन लिफ्ट आणि आरसा हे समीकरण तयार झालं आणि यातला मूळ उद्देश मागे पडला.

काहीही न करता एका जागी शांत उभं राहणं हे सगळ्यांनाच जमणारी गोष्ट नाही भौ!! म्हणून या आरशाची योजना करण्यात आली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required