computer

म्हणून सैनिकांना मिलिटरी कट ठेवावा लागतो!!

मंडळी सेनेचे जवान दिसता क्षणी ओळखले जातात. यामागे अर्थातच त्यांची भारदस्त शरीरयष्टी हे कारण असते तरी अजून एक कारण आहे ज्यामुळे ते लगेच ओळखले जातात, आणि ते कारण आहे आर्मीच्या जवानांची हेअरस्टाईल!! 

छोटे छोटे केस ही आर्मीच्या जवानांची खरी ओळख असते. त्यांचे लहान केस बघून तुम्हाला प्रश्न पडत असेल यांचे केस लहान का असतात. चला तर मग जाणून घेऊया. 

मंडळी सैनिकांना बऱ्याचवेळा सैन्यात अंघोळीला वेळ मिळत नाही. जेव्हा रोज अंघोळ करणे शक्य होत नाही अश्यावेळी लहान केस ठेवणे कधीही चांगले कारण त्यामुळे इन्फेक्शनचा धोका टळतो. त्याचबरोबर सैनिकांना वेगवेगळ्या प्रकारचे हेल्मेट वापरावे लागतात, अशावेळी लहान केस बरे पडतात.

सैनिकांची सर्वात मोठी शक्ती ही त्यांची एकाग्रता असते. आणि मोठे केस असले म्हणजे ते परत परत डोळ्यासमोर येण्याचा धोका असतो. अटीतटीच्या प्रसंगी केसांमुळे एकाग्रता भंग होऊ नये, म्हणून सुद्धा हा उपाय करण्यात येतो. आठवतंय काही वर्षांपूर्वी इशांत शर्माच्या बॉलिंगच्यावेळी त्याच्या 'काले-घने-लंबे' केसांवर किती टीका झाली होती ते?

त्याचबरोबर लहान केस असले म्हणजे डोकं हलके राहते. तसेच सैनिकांना नदी नाल्यांमध्ये नेहमी उतरावे लागते. बाहेर आल्यावर लवकर केस सुखावी आणि सर्दी सारख्या आजाराचा धोका टळावा हे पण एक कारण त्यामागे असते.

मंडळी सैनिक लहान केस ठेवतात त्याचे कुठले एक कारण नाहीये हे तुम्हाला समजले असेलच, ही सर्व कारणे तुम्हाला लहान वाटत असतील. कारण तुम्हाला तेवढी मोठी जबाबदारी उचलावी लागत नाही, पण सैनिकाचे काम मोठे जबाबदारीचे असते. म्हणून त्यांना अश्या गोष्टींची काळजी घेणे बंधनकारक असते.

 

लेखक : वैभव पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required