दिवाळीत जुगार खेळण्याची प्रथा कशी सुरु झाली..

व्हॉट्सअप लोक्स? दिवाळीत मस्त खाऊन पिऊन खूष असाल ना? आत्तापर्यंत दोन चारशे लोकांना व्हॉट्सऍपवर हॅप्पी दिवाळी विश केलं का नाही? आता रात्री पत्ते, फासे, पटावरच्या सोंगट्या अशा प्रकारचा जुगार खेळणार आहात ना? तुम्हाला माहित आहे का, हि जुगार खेळण्याची पद्धत कधी आणि कशी सुरु झाली? 

 

दिवाळीतल्या जुगारातली कथा

 

तर पूर्वीच्या काळी व्हॉट्सऍप, फेसबुक, कँडी क्रश आणि इंटरनेटवर इतर काही टाईमपासची साधनं तर नव्हती.   त्यामुळे वेळ घालवायला शंकर  आणि पार्वती फासे खेळायचे. असंच एकदा  ते दोघे खेळत असताना पार्वती गेम जिंकली आणि खूष होऊन तिनं डिक्लेर केलं की दिवाळीच्या रात्री जो पण जुगार खेळेल त्याला अंकल स्क्रुजपेक्षा जास्त संपत्ती मिळेल.

काळाच्या ओघात या खेळाचं रूप बदलत गेलं, महाभारतासाठी फेमस असलेलं द्यूत असो की सोंगट्या, लोक वेगवेगळ्या पद्धतीचे जुगार खेळायचे. आता बऱ्याच ठिकाणी पत्ते खेळण्याची पद्धत आहे. त्यातही तीन पत्ती आणि रमी जास्त खेळतात.  

आहे ना भारी प्रकार! जुगारासारखा बदनाम प्रकार आपल्याकडच्या सगळ्यात मोठ्या सेलिब्रेशनचा भाग होतो. आज ही कथा आपल्या घरच्यांना ऐकवा आणि बिनधास्त पत्त्यांचा डाव टाका. आज लक्ष्मीपूजनानंतर तुम्हालापण भरपूर धनलाभ होईल.

 

सबस्क्राईब करा

* indicates required