सगळ्या ब्लेड्समध्ये याचप्रकारचं डिझाईन का असतं बुवा? माहीतीये का तुम्हाला?

 

मंडळी, ब्लेड ही वस्तू दिसायला जरी छोटी असलं तरी त्याचे मोठे उपयोग सर्वांनाच माहीत आहेत. खास करून शेव्हिंगसाठी आपल्याला ते नेहमीचं गरजेचं असतं. पण तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही खरेदी केलेल्या प्रत्येक ब्लेडवर एका विशिष्ट प्रकारच्या डिझाईनची जागा सोडण्यात आलीये. हे डिझाइन आपल्याला सर्वच ब्लेड्सवर दिसतं. पाहूया यामागे काय कारण आहे...

१९०१ साली जिलेट कंपनीचे संस्थापक किंग कॅम्प जिलेट यांनी  विल्यम निकर्सन या आपल्या सहकार्‍यासोबत मिळून या ब्लेडचं डिझाईन बनवलं. या ब्लेड डिझाईनचं त्यांनी पेटंट घेतलं आणि १९०४ पासून त्याचं औद्योगिक स्वरूपात उत्पादनही सुरू केलं.

या १९०४ वर् जिलेट कंपनीने पहिल्यांदा १६५ ब्लेड्स बनवली होती. या ब्लेड्सचं डिझाईन असं होतं की ते याच कंपनीने बनवलेल्या शेव्हिंग रेझर मध्ये बोल्ट लावून बसवता येतील. त्यावेळी जगात दुसरी कोणतीही कंपनी अशाप्रकारचं सेफ्टी रेझर बनवत नव्हती.

काही काळानं कंपनीची ही ब्लेड बनवण्याची पद्धत जाणून घेऊन इतर कंपन्यांनीही ब्लेड बनवायला सुरुवात केली. पण शेव्हिंग करण्याचे रेझर मात्र जिलेट कंपनीचेच होते. या रेझर्समध्ये त्याचप्रकारची जागा असायची जशी आज सगळ्या ब्लेड्समध्ये रिकामी ठेवली जाते. त्यामुळे ब्लेड बनवणाऱ्या सर्व कंपन्या आपल्या ब्लेड मध्ये अशा डिझाईनची जागा रिकामी ठेवू लागल्या. जेणेकरून जिलेटवाल्या रेझर मध्ये ते ब्लेड बसवता येईल. एकंदरीत सर्वांनी जिलेटच्या ब्लेडचीच कॉपी केली. आणि हेच डिझाईन आजही प्रत्येक ब्लेडवर आपण पाहतोय मंडळी.

माहीती आवडली तरी शेअर नक्की करा...

सबस्क्राईब करा

* indicates required