त्याने २५००० फुटांवरून पॅराशूटशिवाय उडी मारली, पाहा पुढे काय झाले ते !!!

बंजी जंप, स्कायडाइविंग सारखे थरारक अनुभव घेणे म्हणजे मृत्यूला प्रत्यक्ष जाऊन ‘हाय हॅल्लो’ करून येण्यासारखेच आहे पण तरीही हे झालं साध्या नॉर्मल माणसांसाठी. आता आपण वळूया अॅबनॉर्मल म्हणजे असामान्य माणसांकडे.

‘ल्यूक एकिन्स’ नावाच्या बहाद्दराने जे केलं ते बघून तुम्हीही म्हणाल की असं करणारा सामान्य नसेलच. ल्युकने तब्बल २५००० फुटावरून स्कायडाइविंग केली आणि तेही पॅराशूट शिवाय. असं धाडस करणारा ल्युक हा जगातला पहिला व्यक्ती ठरला आहे.

epa05449476 US skydiver Luke Aikins lands safely after jumping 25,000 feet from an airplane without a parachute or wing suit as part of 'Stride Gum Presets Heaven Sent' in Simi Valley, California, USA 30 July 2016. EPA/MARK DAVIS / STRIDE GUM / HANDOUT HANDOUT EDITORIAL USE ONLY/NO SALESस्रोत

दक्षिण कॅलीफोर्नियाच्या सिमी वॅली मध्ये ल्युकने हा थरारक विक्रम केला आहे. फक्त २ मिनिटाच्या उडीत त्याने ताशी १९३ किलोमीटरच्या वेगाने पृथ्वीवर लँडिंग केले.

आणखी काही सांगण्यापेक्षा तुम्हीच बघा हा थरार...हा विडीओ बघताना तुमच्या अंगावर काटा नाही आला तरच नवल !!!

सबस्क्राईब करा

* indicates required