जगातील मोबाईल फोनची सगळ्यात मोठी फॅक्टरी आता दिल्लीत !!

जगातील मोबाईल फोनची सगळ्यात मोठी फॅक्टरी आता दिल्लीत !  दक्षिण कोरियातील सॅमसंग हे आपल्या घरोघरी पोहचलेले नाव आहे. गेल्या वर्षी या कंपनीने भारतात ४९१५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा मनसुबा जाहीर केला होता. त्या योजनेनुसार दिल्लीजवळ नोएडा परिसरात ३५ एकर जागेत या नव्या फॅक्टरीचे उदघाटन होणार आहे. या फॅक्टरीत दर वर्षी १२ कोटी मोबाईल चे उत्पादन होणार आहे. या खेरीज फ्रिज आणि टीव्हीचे उत्पादन पण होणार आहे.

दक्षिण कोरियात हे करणे सहज शक्य असताना सॅमसंग ने भारतात फॅक्टरी टाकण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याला काही कारणे आहेत ती अशी :

२०१९ पर्यंत आपल्या सरकारचे उद्दिष्ट ५० कोटी मोबाईलचे आहे. अशा वेळी बाजारपेठेच्या जवळच उत्पादन करणे हा सॅमसंगचा हुशार निर्णय आहे.

सोबतच येणाऱ्या काही वर्षांत फ्रिज टीव्ही सारखी उत्पादने, ज्याला व्हाइट गुड्स म्हटले जाते, त्याचा खप मोठ्या प्रमाणात वाढणार असण्याची खात्री सॅमसंग ला वाटत असावी. 

रोजगार आणि  कर संकलन या दोन्ही दृष्टीने आपल्याला फायदा होणार आहे हे नक्की !!

सबस्क्राईब करा

* indicates required