भारतीय लोक कमी आनंदी, पाकिस्तानही भारताच्या पुढे. जाणून घ्या कोणत्या क्रमांकावर आहे भारत

तुम्ही खूष आहात का?? भारतातले लोक खूष आहेत का?? या सगळ्याचे उत्तर देणे तसे अवघड आहे. कारण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमुळे आपला आंनद म्हणजेच हॅप्पीनेस वाढतो किंवा कमी होतो. सद्य परिस्थिती पाहता आपण भारतीय लोक फार खूष असावे असे वाटत नाहीय.  तर युनायटेड नेशन्सने केलेल्या एका सर्व्हेनुसार (वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट २०१८) आपण भारतीय लोक फार काही खूष नाहीत आहोत. 

या सर्व्हेत जगातल्या  देशांमध्ये लोक किती खूष आहेत याचा एक आढावा घेण्यात आला. त्यानुसार या वर्ल्ड हॅप्पीनेस इंडेक्समध्ये जगभरातल्या १५६ देशांच्या लोकांच्या आनंदी असण्याचा अभ्यास केला गेला. त्यात आपल्या भारताचा नंबर लागलाय १३३ वा. गेल्या वेळेसपेक्षा आपण ११ क्रमांकाने खाली आलो आहोत. आपल्या शेजारी देशांनी या बाबतीत आपल्यापेक्षा चांगली कामगीरी केली आहे. पाकिस्तान ७५, भूतान ९७, नेपाळ १०१, बांगलादेश ११५ आणि श्रीलंका ११६ क्रमांकावर आहे.

कसा मोजला जातो हॅप्पीनेस??
हॅप्पीनेस मोजण्यासाठी बऱ्याच गोष्टींकडे लक्ष्य द्यावं लागतं. म्हणजे पाहा..
१. ग्रोस डोमेस्टिक प्रॉडक्ट् पर कॅपिटा
२. आयुर्मान ( Life Expectancy)
३. सोशल सपोर्ट 
४. निर्णय स्वातंत्र्य ( freedom to make life choices)
५. औदार्य 
६.  भ्रष्टाचार ( perception of corruption)
७.  Dystopia ( जिथे जगातल्या सगळ्या गोष्टी वाईट असतात अशी एक काल्पनिक जागा)

या सातही बाबतीत आपल्या जनतेच्या भावना आपल्याला माहीत आहेत. त्यामुळे आपण या इंडेक्समध्ये खाली असणे साहजिकच आहे. पण कोणते देश आहेत जे जगातले सगळ्यात आनंदी देश आहेत??

१. फिनलंड
२. नॉर्वे
३. डेन्मार्क
४. आईसलँड
५. स्वित्झर्लंड

मग मंडळी, आपण या वर्षी आहोत त्याहून पुढच्या वर्षी अधिक खूष असू का? तुम्हांला काय वाटतं??

सबस्क्राईब करा

* indicates required