खरी खुरी रिव्हॉल्वर रानी...भर मंडपातून उचललं नवरदेवाला !!!

भेंडी प्यार किया तो डरना क्या? भौ, प्रेमाचा लफडा असला की काय पन, म्हणजे काय पन करायचा समजला ना ? नुसतं अरिजित सिंह तात्याचं गाणं ऐकत बसायचा नाय. मायला तिचा बाप तिला दुसऱ्याच्या गळ्यात बांधतो अन तुमी इथं बसताय रडतं. कसं दिसतं ते ?

आता या ‘युपी’ वाल्या ताई कडून प्रेरणा घ्या की राव. भर मंडपातून, भर दिवसा, वऱ्हाड्यांच्या समोरून पोराला पळवलंय बाईसायबांनी. आहात कुटं?  हाय का नाय फिल्लम वाली स्टाईल? एकदम खरीखुरी 'रिव्हॉल्वर रानी'.

भाई श्टोरी अशी हाये की हमीरपूर, उत्तर प्रदेश मधी राहणार्‍या अशोक यादवचं आणि ताईचं लफडं होतं. लफडा लय बेस चाल्ला. पन नंतर अशोक ताईला सोडून घरच्यांनी सांगितलेल्या मुलीशी लग्न करायला तयार झाला. आता लग्न होणार म्हटल्यावर हिला त्याने इग्नोर केलं अन लग्नाला उभा राह्यला. मग काय सटकली ना ताईची. तिने बदला घ्यायचं ठरवलं.

लग्नाची तयारी झाली होती, वऱ्हाडी आले होते अन तेवढ्यात एक SUV येऊन घराबाहेर थांबली. त्यातनं ३ जण बंदूक घेऊन उतरले. चौथी आपली रिवॉल्वर रानी बाहेर निघाली आन सीधे बंदूक अशोकच्या डोक्यावर ठेवून त्याला घेऊन पळाली. मायला वऱ्हाड्यांची हवा टाईट !!

आता ही वेगळी गोष्ट की रिव्हॉल्वर रानीच्या पाठी अकरा वेशीचे पोलीस अंघोळ करून लागले अन तिला ताब्यात पन घेतलं. खरी गोष्ट तर ही की पोलिसांनी तिचीच बाजू घेतली हाये. कायपण बोला...प्रेरना घेण्यासारखं काम केलंय ताईनं.

सबस्क्राईब करा

* indicates required