जगातील सर्वात तरुण राणी बद्दल या गोष्टी माहित आहेत का ?

भूतानची ‘जेत्सुन पेमा’ आहे जगातील सर्वात तरुण राणी! मंडळी जगात २५ पेक्षा जास्त शाही परिवार आहेत. पण या सर्वांमध्ये सर्वात तरुण राणी होण्याचा मान जेत्सुन पेमाला मिळाला आहे. २०११ साली एकीकडे ‘प्रिन्स विल्यम’ आणि ‘केट मिडलटन’ यांचा विवाह जगभरात चर्चेत असताना आणखी एक जोडी लग्नबंधनात अडकली.  मात्र त्याकडे जगाचे फारसे लक्ष नव्हते.

स्रोत

‘ड्रॅगन किंग’ म्हणवले जाणारे  भूतानचे राजे,  ‘जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक’ आणि ‘जेत्सुन पेमा’ यांचा शाही विवाह २०११ साली झाला. त्यावेळी जेत्सुनचं वय अवघं २१ होतं. आज ती 27 वर्षांची असली तरी तिच्या नावे असलेला ‘सर्वात तरुण राणी’चा किताब अजूनही तिच्याच जवळ आहे.

जेत्सुनबद्दल सांगायचं झालं तर तिनं लंडनमधल्या ‘रिजंट्स स्कूल’ मधून शिक्षण पूर्ण केलंय. तिच्या वंशाची पाळेमुळे भूतानच्या शाही घराण्याशी निगडीत असल्याचं म्हटलं जातं. ती तिच्या पारंपारिक फॅशन आणि स्टाईलसाठी जगभरात ओळखली जाते. ती राणी असली तरी ती तिच्या समाजसेवेसाठी प्रसिद्ध आहे. तिची आणि राजे जिग्मे घेसर यांची ओळख कशी झाली, याबद्दल काही ठोस माहिती मिळत नाही.  पण असं म्हणतात की त्यांचा प्रेम विवाह झाला आहे.

परफेक्ट कपल

स्रोत

शाही परिवारात बहुपत्नीत्व मान्य असलं तरी ड्रॅगन किंगने आपण दुसरा विवाह करणार नाही असं जाहीर केलंय. यावरूनच दोघांचं एकमेकांवरचं प्रेम दिसून येतं. दोघांनाही आवडणारा विषय म्हणजे ‘कला’. मंडळी, खरं तर दोघांच्या वयामध्ये १० वर्षांचं अंतर आहे.  पण हे अंतर कधी दिसून येत नाही. २०१६ साली भूतानच्या या शाही ‘कपल’ला मुलगा झाला आहे, आता फेब्रुवारी मध्ये तो २ वर्षांचा होईल. ऑक्टोबरमध्ये दोघांनी आपल्या लहानग्या बरोबर केलेल्या भारतदौऱ्याच्या चर्चा तुम्ही वाचल्या असतीलच. 

स्रोत

मंडळी, राजा आणि राणीची जोडी असावी तर अशी !!

सबस्क्राईब करा

* indicates required