computer

चुकीच्या लिंकवर क्लिक करणाऱ्या सिद्धार्थ बात्राला न्यायालयाने काय निर्णय दिलाय?

काही दिवसांपूर्वी आयआयटी मुंबईत एका चुकीच्या क्लिकमुळे ऍडमिशन रद्द झालेल्या सिद्धार्थ बात्राची हकीकत आम्ही तुम्हाला सांगितली होती. त्यावेळी त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन आपले ऍडमिशन व्हावे अशी मागणी केली होती.

वर्ष वाया जाण्याच्या भीतीने टेन्शनमध्ये असलेल्या सिद्धार्थला न्यायालयाने दिलासा देत त्याचे ऍडमिशन करण्यात यावे असा आदेश दिला आहे. सिध्दार्थचे ऍडमिशन होऊन देखील एका चीकीच्या क्लिकमुळे त्याचे ऍडमिशन रद्द करण्यात आले होते.

मुंबई हायकोर्टाने सिद्धार्थची याचिका नाकारत त्याचे ऍडमिशन रद्द करण्याचा आयआयटी मुंबईचा निर्णय बरोबर ठरवला होता. म्हणून सिद्धार्थने आपले वकील प्रल्हाद परांजपे यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात दादा मागितली होती.

सिद्धार्थचे वडील लहानपणी वारले होते तर त्याची आई काही वर्षांपूर्वीच मरण पावली. अशाही परिस्थितीत आपल्या आजी आजोबांकडे राहून सिद्धार्थ शिक्षण पूर्ण करत आहे. आयआयटीत देशात २७८ रँक मिळवत त्याने आयआयटी मुंबईत प्रवेश मिळवला होता.

सिद्धार्थने वर्ष वाया जाण्याच्या भीतीने प्रचंड प्रयत्न केले. मुंबई हायकोर्टाने विरुद्ध निकाल दिला तरी निराश न होता त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आणि शेवटी त्याला यश मिळाले आहे. आता तो व्यवस्थितपणे आयआयटी मुंबईतून इंजिनिअरिंग पूर्ण करू शकणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required