२०२० च्या संकटात भारतीयांनी केलेले १२ भन्नाट जुगाड...हे जुगाड नक्कीच कौतुकास्पद आहेत!!

जुगाड हा भारतीयांचा स्वभाव आहे. कोणत्याही कठीण परिस्थितीत आहे त्या गोष्टीतून मार्ग काढण्यात भारतीयांचा हात कोणीही धरू शकत नाही. २०२० सालात करोनामुळे नवीन समस्या निर्माण झाल्या आणि भारतीय लोकांनी यातूनही खास भारतीय पद्धतीने मार्ग शोधून काढले. अशा खास जुगाडांची एक यादीच आम्ही आज घेऊन आलो आहोत. २०२० संपायला एक दिवस उरलेला आहे, यानिमित्ताने भारतीयांनी केलेले जुगाड नक्कीच पाहण्यासारखे आहेत.
१. करोना काळात सोशल डिस्टंसिंग पाळणे गरजेचे होते, पण लग्नही महत्त्वाचे आहे. म्हणून एका लग्नात चक्क पेंट रोलरने नवरीला हळद लावली गेली. याहून चांगला पर्याय शोधून सापडला नसता.
२. मध्ये एकदा बँक ऑफ बडोदाच्या गुजरात शाखेतील व्हिडीओ व्हायरल झाला होता. बँकेतील कॅशियर चेक निर्जंतुक करण्यासाठी चक्क इस्त्रीचा वापर करताना दिसतायत.
३. हा जुगाड एका भारतीय शेतकऱ्याचा आहे. या शेतकऱ्याने ठिबक सिंचनासाठी ग्लुकोजच्या बाटल्यांचा वापर केलाय.
४. भाज्या आणि फळे स्वच्छ करणे अत्यंत अवघड काम होते. यासाठी एका भारतीयाने तर थेट कुकरच्या वाफेचा वापर केला.
५. कोरोना तर येत-जात राहील ओ, पण दारू महत्त्वाची आहे. एका दारूविक्रेत्याने ग्राहकांना दारू विकण्यासाठी काय जुगाड केला हे तुम्ही फोटोत पाहूच शकता.
६. या जुगाडाचं नक्कीच कौतुक करायला हवं. झोपाळ्याच्या आधारे उदरनिर्वाह करणाऱ्या या माणसाने झोपाळ्यावरच सगळा संसार लादलेला दिसतोय. प्रवास करता यावा म्हणून झोपाळ्याला बाईक जोडली आहे.
७. वरतीच म्हटल्याप्रमाणे दारू महत्त्वाची आहे. यासाठी दुकानदार जसे प्रयत्नशील आहेत तसेच ग्राहकही प्रयत्न करत आहेत. तामिळनाडूच्या एका ग्राहकाने तर स्वतःच्या रोबॉटलाच दारू आणायला पाठवलं.
८. आकारानुसार फळांची विभागणी करण्यासाठी या फळवाल्या भाऊने अगदी सोपी पण प्रभावी शक्कल लढवली आहे.
९. हा फोटो नोएडाचा आहे. लिफ्टला बोट लागू नये म्हणून एक टूथपिक्स ठेवलेले आहेत. एक टूथपिक काढायची आणि त्याने बटन दाबायचं. बटन दाबून झालं की टूथपिक खालच्या डब्यात टाकायची. स्वच्छता राखण्यासाठी हा मार्गही भारीच आहे.
१०. लॉकडाऊनमध्ये पाणीपुरी प्रेमींचे हाल झाले होते. म्हणून छत्तीसगडच्या रायपुर जवळील एका पाणीपुरीवाल्याने पानिपुरची मशीनच तयार केली. ग्राहक स्वतः पाणीपुरी घेऊन खाऊ शकतात अशी व्यवस्था या मशीनमध्ये होती.
११. दुधविक्रेत्याने दुधाचं वाटप करण्यासाठी एक लांब पाईप वापरला होता. या पाईपच्या माध्यमातून लांबूनच ग्राहकांना दुध मिळत होतं. आहे का नाही डोक्यालिटी ?
सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी दुध विक्रेत्याने काय शक्कल लढवली पाहा !!
१२. आगरतळाच्या एका व्यक्तीने कोरोना काळात सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी एका नवीन बाईकचीच निर्मिती केली आहे. या बाईकमध्ये दोन सीटच्यामध्ये भरपूर जागा ठेवण्यात आली आहे.
१३. अलीकडेच एका भारतीय शिक्षकाने पिरीयोडिक टेबल किंवा मराठीत सांगायचं तर आवर्त सारणी लक्षात ठेवण्यासाठी एक सोपा आणि मजेशीर जुगाड शोधून काढला होता. हा व्हिडओ प्रचंड व्हायरल झाला.
१४. टोळधाड रोखण्यासाठी तयार केलेली मशीन

तुम्हाला तर ठाऊक असेलच की काही महिन्यांपूर्वी टोळधाडीने शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं होतं. या संकटातून बाहेर पडण्यासाठी एका शेतकऱ्याने एक मशीन तयार केली होती. या मशीनचा आकार विमानासारखा होता. त्यावर लावलेल्या पंख्यामुळे धातूचा डबा वाजायचा आणि त्यामुळे टोळधाड थांबायची.