ATM फोडायला गेलेला चोर ATM मध्येच कसा अडकून पडला? हा पाहा व्हिडीओ!!

एटीएममधून पैसे चोरण्याच्या प्रयत्नांबद्दल अनेक गोष्टी आपण ऐकत असतो. पूर्ण एटीएम उचलून घेऊन जाणारे चोरही कमी नाहीत. मागे एका चोराने एटीएम फोडूनपण त्याच्यातून त्याला गरज आहे तेवढेच पैसे काढले होते. सीसीटीव्हीत हा क्षण कैद झाला तेव्हा त्याचे भरभरून कौतुक झाले.
तमिळनाडूतील नमक्केल जिल्ह्यात एटीएम फोडीचा असाच एक प्रयत्न झाला. तो प्रयत्न फसला मात्र त्याहीपेक्षा तो भयानक हास्यास्पदरित्या फसला आहे. उपेंद्र रॉय नावाचा मूळ बिहारमधील असलेला तरुण एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात चक्क त्याच एटीएममध्ये अडकला. तिथुन त्याला बाहेरच येता येत नव्हते. त्याची फजिती बघून पोलिसांना पण हसू आवरत नव्हते.
Tamil Nadu: Man gets stuck between ATM and wall while trying to steal money
— Economic Times (@EconomicTimes) August 7, 2021
Track latest news updates here https://t.co/LVTMDBzmMx pic.twitter.com/TNJIYDObr1
२८ वर्षीय उपेंद्र तमिळनाडूत एका पोल्ट्रीत कामाला आहे. दारूच्या नशेत त्याने थेट एटीएम फोडण्याची योजना आखली आणि कामाला लागला मात्र तो मध्येच फसला आणि त्याचा प्लॅन पण फसला. त्याला अशा अवस्थेत अडकलेला पाहून लोकांनी लागलीच पोलिसांना बोलावून घेतले.
पोलिसांनी त्याला अटक करून न्यायाधीशांसमोर उभे केले. सध्या भाऊ तुरुंगाची हवा खात आहे. त्या एटीएममध्ये जवळपास अडीच लाख रुपये असल्याचे म्हटले जात आहे. चोर सापडणे तसे नेहमीचे असले तरी हा चोर मात्र देशभर फेमस झाला आहे.