अफगाणिस्तानातून पळून जाणारे दोनजण विमानातून कसे फेकले गेले? हा व्हायरल व्हिडीओ पाहा!!

अफगाणिस्तान देशात सध्या प्रचंड अराजक माजले आहे. तालिबानने या देशाला पूर्णपणे आपल्या कवेत घेतले आहे. त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा पैशांनी भरलेल्या विमानात बसून पळून गेले आहेत. तालिबानचा नुकताच एक फोटो आला आहे. त्यात तालिबानी लोक थेट राष्ट्राध्यक्क्षाच्या कॅबिनमध्ये बसले आहेत. अशी भयावह परिस्थिती तिथे निर्माण झाली आहे.

आज मात्र जगभर व्हायरल झालेला एक व्हिडिओ लोकांच्या हृदयाचा ठोका चुकवत आहे. तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुल ताब्यात घेतल्याबरोबर लोकांनी देश सोडून पलायन सुरू केले आहे. मात्र देशाबाहेर जाण्यासाठी विमान हवे. लोक जास्त आणि विमान कमी अशा परिस्थितीत विमान पूर्ण भरल्यावर लोक चक्क विमानाच्या पात्यांना आणि चाकांना धरून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहेत. चाकाला लटकलेले लोक विमानाने उड्डाण भरल्यावर एवढ्या उंचावरून खाली पडत असतानाचे व्हिडीओ कुणाला पण अस्वस्थ करू शकतात.

अक्षरशः बस आणि रेल्वेला लटकुन प्रवास करावा अशा पध्दतीने लोक तिथे विमानांना लटकत आहेत. विमानातून पडून काही लोकांचा मृत्यू झाला आहे. तर विमानतळावर चेंगराचेंगरी होत आहे. अशा सर्व परिस्थितीत तेथील विमाने बंद करण्यात आल्याने अधिकच समस्या उदभवण्याचे चित्र आहे.

लोकांना स्वदेशात थांबणे हे विमानाला लटकून मरण्यापेक्षा अधिक धोकेदायक वाटत आहे. यावरून अफगाणिस्तानमधील परिस्थिती किती भीषण असेल याचा अंदाज येऊ शकतो.

 

आणखी वाचा:

काय घड्तंय अफगाणीस्तानमध्ये ? जाणून घ्या - काबूल एक्सप्रेस भाग १

सबस्क्राईब करा

* indicates required