उरात भरली धड धड धडकी-आलं.. बजेट आलं!!

आजपासून संसदेचं अंदाजपत्रकीय सत्र (बजेट सेशन) सुरु होतंय. आज आर्थिक सर्वेक्षण आणि उद्या बजेट.

पण झालं असं आहे की, आठ नोव्हेंबरच्या शॉक ट्रीटमेंटनंतर उद्या काय होणार या भीतीनं अनेकांच्या छातीत धडकी भरलीय. कालपासून बेनामी मालमत्ता कायद्याची धडाक्याने अंमलबजावणी व्हायला सुरूवात पण झालीय. म्हणजेच, बजेटपूर्वीचे फटाके वाजायला सुरुवात झाली आहे .

पण थांबा ... उगाच घाबरायचं तसं काही कारण नाही. का म्हणून काय विचारता?  हे बजेट आल्यावर त्याचा अर्थ लावणंच थोडंसं कठीण जाणार आहे. त्याची कारणंही काहीशी अशी आहेत..

(अ) रेल्वे बजेटचा अंतर्भाव या बजेटमध्ये केला गेला आहे.

(आ)नियोजित खर्च आणि अनियोजित खर्च हे दोन्ही मुद्दे बाद करण्यात  आले आहेत आणि  त्याऐवजी प्रत्यक्ष जमा-खर्चाचे आकडे येणार आहेत.

(इ) जीएसटीची अंमलबजावणी आणि लागू होणारे दर अनाकलनीय म्हणजेच डोक्यावरून जाणारे आहेत.

(ई )नेहमीपेक्षा तब्बल अठ्ठावीस दिवस आधी हे बजेट आल्यामुळं संसद सदस्य आणि जनता यांना काही सशक्त मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.


सर्व सामान्य जनतेनी एकच खबरदारी घ्यायची आहे, ती म्हणजे अंदाजपत्रक आल्यावर सोशल मिडीयावर जो धुरळा उडेल त्याला बळी पडू नये. सोशल मिडीयावर जे अर्धेकच्चे अर्थतज्ञ बरळतात ते सत्य असतेच असे नाही. खास म्हणजे व्हॉट्सऍपवर जे इकडून तिकडे फॉर्वर्ड केलेले मेसेजेस येतात, त्यामध्ये दोन प्रकार असतात. एक प्रकार म्हणजे एक्स्प्रेशन आणि दुसरा प्रकार ओपीनीअन. एक्स्प्रेशनला बळी न पडणे हा शहाणपणा आपण सर्वांनी दाखवणे अत्यावश्यक आहे.


आता खास बोभाटाचे अंदाज :
१ आयकरात सूट मिळण्याची मर्यादा आणि आयकराच्या दरात घट.( पन्नास दिवसाच्या सबूरीचे घसघशीत फळ)
२ शिक्षण -आरोग्य-शेती आणि शेतकरी यांना विशेष सूट.
३ रेल्वेवर होणारा खर्च इन्फ्रास्ट्रक्चर सोबत घेतल्यानं खास रेल्वे बाँड अपेक्षित.
४ सरकारी नोकर भरतीत वाढ -नोकर्‍या वाढणार
५ ग्रामीण भागात सुरु होणार्‍या सूक्ष्म लघु-मध्यम उद्योगांना विशेष सूट.
६ संरक्षण खात्यातर्फे नोकर भरतीत वाढ होण्याची शक्यता.

आणि आता जाताजाता खास सल्ला- शेअर बाजारात काय कराल? सिमेंट कंपन्या आणि बँकाचे शेअर घेऊन ठेवा.

सबस्क्राईब करा

* indicates required