computer

आरोग्यमंत्र्यांना चक्कर आल्यावर पंतप्रधानांनी जे केलं ते राजकारणात आजवर कुणीच केलं नसेल!!

सध्याच्या आणीबाणीच्या काळात आपण सर्वांनी एकत्र येउन लढा द्यायची गरज आहे. डच पंतप्रधानांनी स्वतःच्या कृतीतून ही गोष्ट अधोरेखित केली आहे.

(ब्रुनो ब्रुइन्स)

डच आरोग्यमंत्री ब्रुनो ब्रुइन्स हे संसदेच्या अधिवेशनात COVID-१९ आजारावर बोलत असताना चक्कर येउन कोसळले. यानंतर ब्रुनो ब्रुइन्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. हे कौतुकास्पद होतंच, पण पुढे जे घडलं त्याचं जगभरात कौतुक होत आहे.

(मार्क ऱ्यूट)

ब्रुनो ब्रुइन्स यांची जागा घेण्यासाठी डच पंतप्रधान मार्क ऱ्यूट यांनी चक्क विरोधी पक्षातील मार्टिन वॅन रिज्न यांना आरोग्यमंत्रीपद दिलं. हे करत असताना ते म्हणाले की ‘मार्टिन यांना आरोग्यविभाग आणि आरोग्यमंत्रालयात काम करण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे.’ मार्टिन वॅन रिज्न हे पुढील ३ महिने आरोग्यमंत्री म्हणून काम करणार आहेत.

(मार्टिन वॅन रिज्न)

आजारी असलेल्या स्वतःच्याच पक्षातील मंत्र्याला काढून विरोधी पक्षातील अनुभवी मंत्र्याला आपल्या सरकारात जागा देण्याची ही दुर्मिळ वेळ आहे. याबद्दल डच राजकीय क्षेत्रात याची चर्चा तर झालीच पण जगभरात लोकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

तर, बोभाटा पब्लिक काय म्हणाल या निर्णयाबद्दल?

सबस्क्राईब करा

* indicates required