निवडणुकांच्या तोंडावर विंदांची ही कविता आठवल्याशिवाय राहत नाही..

Subscribe to Bobhata

काल मतदान झाले. उद्या निकाल जाहीर होतील. नवे - जुन्यातूनच पुन्हा नवे - विजयी उमेदवार सत्तेवर येतील. काही जिंकून विरोधी पक्षाच्या बाकावर बसतील आणि गावगाडा पुन्हा एका नव्या चाकोरीतून फिरायला लागेल. पण...ज्यांनी मतदान केले त्या जनतेच्या मनात एकच प्रश्न उभा असेल तो असा की येणारे नवे उमेदवार माझ्यासाठी काम करतील की पुन्हा एकदा  "सब घोडे बारा टक्के" या न्यायाने परीस्थिती जैसे थे अशीच राहील ? सर्व सामन्यांची ही भावना विंदा करंदीकरांनी सब घोडे बारा टक्के या कवितेत व्यक्त केली आहे आज ऐका आणि वाचा विन्दांची कविता त्यांच्याच आवाजात :

 

जितकी डोकी तितकी मते

जितकी शिते तितकी भूते;

कोणी मवाळ कोणी जहाल 

कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ

कोणी ढीले कोणी घट्ट; 

कोणी कच्चे कोणी पक्के

सब घोडे बारा टक्के!

 

 

गोड गोड जुन्या थापा 

(तुम्ही पेरा तुम्ही कापा)

जुन्या आशा नवा चंग 

जुनी स्वप्ने नवा भंग;

तुम्ही तरी काय करणार? 

आम्ही तरी काय करणार?

त्याच त्याच खड्ड्या मधे 

पुन्हा पुन्हा तोच पाय;

जुना माल नवे शिक्के 

सब घोडे बारा टक्के!

 

 

जिकडे सत्ता तिकडे पोळी 

जिकडे सत्य तिकडे गोळी;

(जिकडे टक्के तिकडे टोळी) 

ज्याचा पैसा त्याची सत्ता

पुन्हा पुन्हा हाच कित्ता; 

पुन्हा पुन्हा जुनाच वार

मंद घोडा जुना स्वार; 

याच्या लत्ता त्याचे बुक्के

सब घोडे बारा टक्के!

 

सब घोडे! चंदी कमी; 

कोण देईल त्यांची हमी?

डोक्यावरती छप्पर तरी; 

कोण देईल माझा हरी?

कोणी तरी देईन म्हणा 

मीच फसविन माझ्या मना!

भुकेपेक्षा भ्रम बरा; 

कोण खोटा कोण खरा?

कोणी तिर्ऱ्या कोणी छक्के; 

सब घोडे बारा टक्के!

सबस्क्राईब करा

* indicates required