या ८ मराठी मुलींना त्यांच्या संशोधनाबद्दल मिळालं गोल्ड मेडल...त्यांनी लावलेला शोध प्रत्येक भारतीयासाठी महत्वाचा आहे भाऊ !!

मंडळी, पान खाणाऱ्यांचं शौकीन म्हणून कानपूर उगाच बदनाम आहे. भारतातल्या कोणत्याही प्रमुख शहरात जा, सार्वजनिक ठिकाणच्या भिंती पानाच्या/गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी हमखास रंगलेल्या असतात. एवढंच काय ट्रेन, सार्वजनिक बसेस मध्ये पण पानाची पिंक आढळतेच. गमतीचा भाग वेगळा पण ही एक खूप मोठी समस्या होऊन बसली आहे. स्वच्छ भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आधी या समस्येवर उपाय शोधणं गरजेचं आहे. 

स्रोत

मंडळी, आनंदाची बाब म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या ८ मुलींनी मिळून या समस्येवर इकोफ्रेंडली उपाय शोधून काढला आहे. ऐश्वर्या राजूरकर. अंजली वैद्य, कोमल परब, निष्ठा पांगे, मैथिली सावंत आणि मिताली पाटील या त्या आठजणी. त्यांच्या या शोधासाठी त्यांना अमेरिकेतील बोस्टन येथील Genetically Engineered Machines (iGEM) स्पर्धेत सुवर्णपदक देण्यात आलं आहे.

चला तर जाणून घेऊया त्यांच्या शोधाबद्दल.

स्रोत

मंडळी, त्यांनी एक विशिष्ट प्रकारचं उत्प्रेरक शोधून काढलं आहे. या उत्प्रेरकामुळे पानाचे डाग लवकरात लवकर आणि कमीतकमी पाण्याचा वापर करून स्वच्छ करता येतात. हे उत्प्रेरक जेल स्वरुपात वापरता येतं. 

स्रोत

मंडळी, हे उत्प्रेरक तयार करण्यासाठी त्यांना काही गोष्टींचा तपास घ्यावा लागला. उदाहरणार्थ, पानाच्या पिंकाचा गडद लाल रंग कुठून येतो ? या लाल रंगतच ते डाग एवढे चिवट का असतात याचं उत्तर लपलेलं होतं. त्यांना मिळालं उत्तर असं की, हा लाल रंग पानातील कात आणि चुन्यामुळे तयार होतो. तो लवकर धुतला जाऊ शकत नाही. अशा डागाला साफ करण्यासाठी अव्वाच्यासव्वा खर्च करावा लागतो. एका तपासात त्यांना आढळलं की महिन्याभरात एका रेल्वेस्टेशनसाठी तब्बल १० लिटर अॅसिड आणि ६०,००० लिटर पाणी वाया जातं. याखेरीज सफाई कामगारांचा सगळा श्रम हे डाग साफ करण्यात वाया जातात. 

स्रोत

मंडळी, तपासातून काढलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी आपलं उत्पादन तयार केलं. हे उत्पादन अशारीतीने बनवण्यात आलं आहे की सफाईच्या वेळी कमीत कमी पाण्याचा वापर होतो. शिवाय अॅसिडचा पूर्ण खर्च वाचतो.

मंडळी, भविष्यात हे उत्पादन सर्वत्र उपलब्ध होऊन त्याचा नक्कीच फायदा होईल. पण सार्वजनिक ठिकाणे व आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही शेवटी आपलीच जबाबदारी आहे. जर आपणच स्वच्छता राखली तर कदाचित असे शोध लावण्याची गरजच पडणार नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required