computer

गाडी-घराच्या किल्ल्या अंगात बसवता येतात? का आणि कुणी केलेत असे उद्योग??

आपले फोन अपग्रेड होत असतात तसं माणसांचं शरीर अपग्रेड झालं तर ? शरीरात नवनवीन गोष्टींच रोपण करून रोजच्या गोष्टी सोप्प्या करता आल्या तर? अमेरिकेच्या एका इंजिनियरने हे शक्य करून दाखवलं आहे

विंटर मॅझ या अमेरिकन इंजिनियरने एका मोठ्या अपघातानंतर स्वतःच्या शरीरात बदल केलेत. तिच्या शरीरात मायक्रोचिप्स आहे ज्याच्या मदतीने ती घराचा दरवाजा उघडू शकते.  याखेरीज तिच्या हातांमध्ये LED लाईट आहेत. एवढंच नाही तर तिच्या बोटांमध्ये लोहचुंबक आहे.

हे तसं नवीन तंत्रज्ञान नाही, पण अजून सर्वसामान्यही झालेलं नाही. विंटरने रोपणाची पद्धत वापरून रोजच्या गोष्टी सोप्प्या केल्या आहेत. याची सुरुवात झाली तिच्या कार अपघातापासून. तिच्या गुढग्याची वाटी ही 3D तंत्रज्ञानाने तयार केलेली आहे.

तिच्या शरीरातल्या गोष्टी काम कशा करतात ?

ज्या प्रकारे कंपनीतील दार कार्डने उघडतं त्याचप्रकारे विंटरच्या हातात असलेल्या चीपने तिच्या घराचं दार उघडतं.तिच्या उजव्या हातात असलेल्या चीपमध्ये तिचा बिझनस कार्ड आहे. फोनद्वारे स्कॅन केल्यास काही सेकंदात चीप मधली माहिती फोनवर दिसते.

त्या LED लाईट्सचा काय उपयोग आहे  ? ते तिने आपल्या आवडीसाठी लावले आहेत. LED लाईट्सवरून लोहचुंबक फिरवल्यावर लाईट्स पेटतात.

मंडळी, सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे हा प्रकार नवीन नाही. २०१७ साली स्टीव्हन नॉर्थम नावाच्या शास्त्रज्ञाने त्याच्या तर्जनी आणि अंगठ्याच्या मध्ये तांदळाच्या दाण्याएवढ्या आकाराची मायक्रोचीप बसवली होती. या लहानशा चीपचा वापर करून हा शास्त्रज्ञ घराचं, ऑफिसचं दार उघडायचा. त्याला कार पण चालू करता यायची.

अॅमी नावाच्या तरुणीने टेसलाची "Tesla Model 3" घेतल्या नंतर असा प्रयोग केला होता. तिच्या कारची चावी तिने हातात बसवून घेतली होती. कसं? ते या व्हिडीओमध्ये पाहा.

तर मंडळी, मोबाईल अपग्रेड होतात तसा माणूस अपग्रेड होतोय. या तंत्रज्ञानाबद्दल तुम्हाला काय वाटतं ?

सबस्क्राईब करा

* indicates required