f
computer

या ५ स्मार्टफोन्सनी २०१६ गाजवलं : तुमच्याकडे यापैकी कोणता आहे? 

२०१६ हे वर्ष बघता बघता सरलं आहे आणि या वर्षात गॅझेट विश्वातही बर्‍याच इंटरेस्टिंग गोष्टी येऊन गेल्या. तुम्हीही कदाचित गेल्या वर्षात नवा स्मार्टफोन खरेदी केला असेल. आज इथे आपण बघणार आहोत असे ५ स्मार्टफोन्स ज्यांची २०१६मध्ये दमदार एन्ट्री झाली... 

एचटीसी 10

 तैवानी कंपनी एचटीसीने बर्‍याच कालावधीनंतर आपला हा नवा आणि दमदार स्मार्टफोन बाजारात उतरवला. 5.2" अॅमोल्ड डिस्प्ले, ४ जीबी रॅम, १२ एमपी रिअर कॅमेरा, अशा अनेक आकर्षक फीचर्समुळे हा स्मार्टफोन लोकप्रिय ठरला. याची किंमत आहे ४५,००० रुपये फक्त. 

मोटोरोला मोटो Z

आक्टोबरमध्ये लॉन्च झालेला हा स्मार्टफोन HTC 10 पेक्षा वरचढ ठरला. कंपनीच्या दाव्यानुसार मोटो Z हा जगातील सर्वात स्लीम आणि पॉवरफुल स्मार्टफोन आहे. 5.5" एचडी सुपर अॅमोल्ड डिस्प्ले, १३ एमपी कॅमेरा, ४ जीबी रॅम, अशी खास फिचर्स या स्मार्टफोनमध्ये मिळतात. विशेष म्हणजे याची बॅटरी १५ मिनीटांच्या चार्जिंगमध्ये ७ तास चालू शकते. या स्मार्टफोनची किंमत आहे ४०,००० रुपये. 

सॅमसंग गॅलॅक्सी S7 एज 

तुम्ही समजू शकता की सॅमसंगने लॉन्च केलेला हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन आहे. ५०,००० रूपये किंमत असलेला हा स्मार्टफोन लोकांच्या खास पसंतीस उतरलाय तो याच्या हाय एन्ड परफॉर्मन्स, दमदार बॅटरी बॅकअप, आणि अविश्वसनीय कॅमेरा क्वालिटीमुळे. याचं बॉडी डिझाईनही विशेष असंच आहे. 

आयफोन ७

आयफोन वेडयांना खऱ्या अर्थाने वेड लावणारा हा आयफोन यावर्षी सप्टेंबर महिन्यात लॉन्च झाला. यावर्षी अॅपलनं आयफोन ७ आणि आयफोन ७प्लस ही दोन मॉडेल्स लॉन्च केली. ज्यांची किंमत ६० पासून ९० हजारापर्यंत आहे. फिचर्समधून वेगळं काही गवसलं नसलं तरी एक ब्रँड म्हणून याच आयफोनने यावर्षी हवा केली. 

गुगल पिक्सेल

अॅपलला टक्कर देऊन बाजारातील आयफोन्सची मक्तेदारी मोडीत काढण्याच्या उद्देशानं गुगलनं आपला हा पिक्सेल आक्टोबरमध्ये बाजारात आणला. आणि सर्वच बाबतीत पिक्सेल हा आयफोन 7 पेक्षा काकणभर सरसही ठरला. याची किंमत ५५ हजारांपासून सुरू होते. आणि गुगल पिक्सेलचं सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे यात असणारं गुगल असिस्टंट फिचर. इतकं असूनही या स्मार्टफोनला आयफोन 7 सोबत म्हणावी तशी स्पर्धा करता आली नाही.

सॅमसंग गॅलॅक्सी नोट 7

यावर्षी विशेष चर्चेत राहिलेला हा आणखी एक स्मार्टफोन. अॉगष्टमध्ये सॅमसंगने आपला हा गॅलॅक्सी सिरीजमधला नवा स्मार्टफोन बाजारात आणला. लोकांनी त्याला चांगला प्रतिसादही दिला. पण अनेक ठिकाणांहून या स्मार्टफोनचा स्फोट झाल्याच्या बातम्या आल्या. बॅटरी प्रॉब्लेमचं निमित्त सांगून कंपनीनं हे सगळे स्मार्टफोन्स परत मागवले आणि नवे रिप्लेस केले. यात कंपनीला बरंच नुकसान सहन करावं लागलं. बाकी यामध्ये पॉवरफूल प्रोसेसर, चांगला कॅमेरा, बेस्ट लुक, आयरीस स्कॅनर अशी अनेक चांगली फिचर्स आहेत. याची किंमत आहे ६०,००० रूपये

सबस्क्राईब करा

* indicates required