बाल शास्त्रज्ञ : माश्याच्या खवल्यांपासून तयार होणार बायो-प्लास्टिक !!

मंडळी प्रदूषणामुळे दिल्लीची स्थिती काय झाली आहे हे आपण बघतच आहात. हवामान बदल हा एक गंभीर प्रश्न होऊन बसलाय. रोज प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. आता प्लास्टिक हा असा घटक आहे की त्याचं विघटन होत नाही त्यामुळे पर्यावरणात तो तसाच राहतो आणि पर्यावरण बिघडत जाते.


स्रोत

मंडळी, प्लास्टिकचा वापर इतका वाढला आहे की प्लास्टिक रोजच्या वापरातून पूर्णपणे बंद करणं सोप्प नाही. यावर एक भन्नाट उपाय शोधून काढलाय ‘सोहम शास्त्री’ या विद्यार्थ्याने. सोहमने एक भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. चक्क माशांच्या खवल्यांपासून त्याने प्लास्टिक बनवण्याचं तंत्र शोधून काढलंय राव. खवल्यांपासून त्याने 'कार्टेजन' नावाचा पदार्थ बनवला आणि या पदार्थातून प्लास्टिकची निर्मिती केली आहे. मंडळी, हा बायो-प्लास्टिक असल्याने त्याचे विघटन होऊन पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही.


स्रोत

सहसा प्लास्टिक हा वर्षानुवर्ष तसाच राहणारा घटक आहे पण सोहमच्या शोधामुळे याचीही समस्या सोडवली जाऊ शकते. मंडळी सोहम हा माटुंगा येथील ‘डॉन बॉस्को’ शाळेतील नववीचा विद्यार्थी आहे. त्याच्या बायो प्लास्टिक प्रकल्पाची निवड ‘बाल वैज्ञानिक परिषदेसाठी’ करण्यात आली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण याआधी सोहमने मांडलेला ‘ल्युब्रिकंट इंजिन ऑइल’ या प्रकल्पाला बाल वैज्ञानिक परिषदेत पुरस्कार देखील मिळाला आहे.

मंडळी सध्याची परिस्थिती पाहता आपल्याला सोहम सारख्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक गरज आहे. आपल्या या बाल शास्त्रज्ञाला बोभाटाचा सलाम !!

सबस्क्राईब करा

* indicates required