computer

नासाने अंतराळ मोहिमेसाठी निवडलेल्या १०पैकी एक डॉ. अनिल मेनन कोण आहेत, त्यांचं आजवरचं काम काय आहे?

अमेरिकेत विविध क्षेत्रांतमध्ये भारतीयांचा डंका वाजतो ही काही नव्याने सांगण्याची गोष्ट नाहीय.अंतराळक्षेत्रात तर अनेक भारतीय महत्वाच्या मिशन्समध्ये सहभागी झालेले दिसतात.आता अशाच एका भारतीय व्यक्तीची महत्वाच्या मिशनसाठी निवड झाली आहे.अनिल मेनन असे त्यांचे नाव आहे.

मेनन अमेरिकन वायूसेनेत लेफ्टनंट या पदावर कार्यरत आहेत. नासाने नुकतेच भविष्यातील मिशन्ससाठी १० लोकांची यादी जाहीर केली आहे. यात एक नाव मेनन यांचे आहे. याआधी मेनन यांनी स्पेसएक्सच्या मिशनमध्ये फ्लाईट सर्जन म्हणून काम केले आहे. त्यादरम्यान त्यांनी नासाच्या स्पेसएक्स डेमो २ मिशनदरम्यान कंपनीकडून प्रवाशांना अंतरिक्षात पाठवण्याच्या पहिल्या मिशनमध्ये मदत केली. तसेच भविष्यातील मिशनसाठी एक चिकित्सक प्रणाली तयार केली होती. मेनन डॉक्टर असल्याने त्यांचे मुख्य काम याच संबंधित असते.

४५ वर्षे वयाच्या मेनन यांचा जन्म अमेरिकेतील मिनीसोटा येथे युक्रेन आणि भारतीय आई वडिलांच्या पोटी झाला होता. त्यांचे संपूर्ण शिक्षण अमेरिकेतच झाले. नासाच्या अधिकृत घोषणेनुसार या निवड करण्यात आलेल्या १० लोकांना दोन वर्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

जानेवारीपासून या नवनियुक्त अंतराळवीरांचे प्रशिक्षण सुरू होणार असून जॉनसन स्पेस सेंटर येथे त्यांचे रिपोर्टिंग असेल. या प्रशिक्षणार्थी अंतराळवीरांचे ५ क्षेत्रांत प्रशिक्षण होणार आहे. यात अंतरिक्ष स्टेशनवरील कठीण प्रणालीचे संचालन, स्पेसवॉकसाठी प्रशिक्षण, रोबोटिक्सचे प्रशिक्षण, T 38 प्रशिक्षण जेटचे संचालन, रशियन भाषा प्रशिक्षण यांचा समावेश आहे.

याआधी मेनन यांनी अवकाश स्टेशनवरील विवाह अभियानांसाठी क्रू-फ्लाईट सर्जन म्हणून सेवा दिली आहे. मेनन यांची ओळख अभ्यासू आणि आकस्मित वेळेत कृतिशील डॉक्टर अशी आहे. त्यांना जंगल आणि एयरोस्पेस चिकित्सा यांच्यासाठी फेलोशिप मिळाली आहे. डॉक्टर म्हणून त्यांनी हैती २०१० भूकंप, नेपाळ २०१५ भूकंप यात मदतकार्य केले आहे. नुकताच जुलै महिन्यात भारतीय महिला सिरिशा बांदला यांनी कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्सनंतर अवकाशात जाणाऱ्या तिसऱ्या भारतीय महिला होण्याचा मान मिळवला होता. आता परत एक भारतीय अवकाशात जाणार असल्याचा आपल्याला निश्चितपणे अभिमान वाटायला हवा.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required