computer

प्रकाशवर्ष म्हणजे नक्की किती अंतर? ते कसे मोजतात? प्रकाशवर्ष हेच एकक या कामासाठी का वापरतात? सर्व उत्तरे इथेच वाचा...

तुम्ही ‘प्रकाश-वर्ष’ हा शब्द आतापर्यंत बर्याचवेळा ऐकला असेल. प्रकाश-वर्ष अंतराळातील अंतर मोजण्यासाठी वापरले जाणारे एकक आहे. आपल्याला किलोमीटर , मीटर हे किती अंतर आहे याचा अंदाज आहे. पण 'प्रकाश-वर्ष' म्हणजे नेमके काय? आणि खगोलशास्त्रज्ञ हे एकक का वापरतात याविषयी जाणून घेऊयात.

प्रकाशवर्षाची पुस्तकी व्याख्या म्हणजे "निर्वात पोकळीमधे प्रकाशवेगाने एका वर्षात गाठलेले अथवा पूर्ण केलेले अंतर"!! हेच जर गणितात पाहायाचे तर एका प्रकाशवर्षात ९४,६०,७३,०४,७२,५८०.८ एवढे किलोमीटर असतात, म्हणजे जवळजवळ सुमारे १००००००००००००० लाख कोटी (10 ट्रिलियन किलोमीटर)किमी एवढे अंतर!!

अंतराळातील अंतर मोजण्यासाठी खगोलशास्त्रज्ञांनी वापरलेले एक प्रकाश-वर्ष प्रकाशाचा किरण एका वर्षात किती प्रवास करतो यावरून मोजले आहे. खगोलशास्त्रज्ञांनी प्रकाशवर्ष हेच एकक का वापरले याचेही काही कारण आहे.

पाहिलं कारण म्हणजे अंतराळातील अंतर अपरिमित आहे. उदाहरणार्थ, प्रॉक्सिमा सेंटॉरी नावाचा तारा हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा आहे. तो पृथ्वीपासून २४,०००,००,००,०००,००० मैल दूर आहे. त्यामुळे तुम्ही सहज समजू शकता की जर आपण त्यापलीकडे गेलो तर आपण ती संख्या मोजणे किंवा लिहिणे अवघड होऊन बसेल. म्हणून एक मापन एकक वापरून ही संख्या समजायला सोपी जाते. म्हणजेच, वरील दिलेलेया संख्येपेक्षा प्रॉक्सिमा सेंटॉरी तारा ४ प्रकाश वर्षे दूर आहे, असे समजणे सोपे जाते.

दुसरे कारण म्हणजे प्रकाश सगळीकडे एकाच वेगाने प्रवास करतो. प्रकाशाचा वेग अंदाजे १,११ करोड किलोमीटर प्रति तास असतो. परंतु सहसा आपल्यला तो लक्षात येत नाही. कारण आपण बटन दाबले की दिवे लागतात. पण ते प्रत्यक्षात असे नसते. प्रकाश अत्यंत वेगवान आहे. म्हणजे पाहा, तुम्ही प्रकाश वेगाने निघालात तर तुम्ही पृथ्वीला आठ वेळा वळसा घालून, दीड सेकंदात चंद्रावर पोहोचाल. तुम्हाला कदाचित माहित असेल की, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यास आठ मिनिटे लागतात. म्हणून आपण पाहातो तो सूर्य नेहमी ८ मिनिटांपूर्वीचा असतो.

पण हे अंतर वाढते तेव्हा मोठ्या प्रमाणावर गोष्टी बदलतात. म्हणजे आकाशगंगेच्या एका टोकाला असलेल्या ताऱ्याचा प्रकाश दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी १,००,००० प्रकाश-वर्षे लागतात. हाच आकडा प्रत्यक्षात किलोमीटर किंवा मैलांमध्ये मांडणे खूप अवघड होऊन बसेल. त्यामुळे हे मोजमापाचे एकक अंतराळातील प्रचंड अंतर मोजण्यासाठी खगोलशास्त्रज्ञांना खूप सोयीचे आहे.

तुम्हाला माहिती आवडल्यास जरूर शेयर करा.

शीतल दरंदळे