computer

एका चिकटपट्टीमुळे ३२०० कोटी डॉलरचा धंदा कसा उभा राहिला ? नव्या उद्योजकांनी वाचायलाच हवे !

घरात हस्तकलेचे प्रयोग करताना सांडलेली गोंदाची बाटली आणि आईचा खाल्लेला ओरडा ज्या पिढीने सहन केला त्या पिढीच्या हातात 'टेप' आल्यावर त्यांना जो आनंद झाला तो आताच्या पोरांना कळणार नाही .त्यानंतर "टेप घे आणि चिकटवून टाक" जनरेशन आली. ज्याला आपण 'टेप' म्हणतो त्याच टेपचं खरं नाव आहे 'स्कॉच टेप' !  आता ती रोजच्या जीवनातील गरजेची आणि अत्यावश्यक वस्तू झाली आहे.  कोणताही कागद किंवा छोटे-मोठे पॅकिंग टेपमुळे सहज शक्य होते. डिंक किंवा गमपेक्षा वापरायला सोपी ,हात चिकट न करणारी ही स्कॉचटेप नक्की कोणी शोधून काढला असावी ? ज्या एका उत्पादनाच्या जोरावर 3M या कंपनीचे भाग्य उजळले ती  3M कंपनीचा अभियंता रिचर्ड ड्र्यू याने शोधून काढली.त्यानंतर सेलोफेन टेप, मास्किंग टेप आणि असे बरेच प्रकार त्यांनी शोधून काढले. आज पाहूयात या शोधाची रंजक कहाणी ! 

रिचर्ड ड्र्यूचा जन्म २२ जून १८९९ ला सेंट पॉल,मिनेसोटा येथे झाला. त्याने मिनेसोटा विद्यापीठात अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. हातात फारसे पैसे नसल्याने तो एका डान्स हॉलमध्ये बॅन्जो वाजवायचा आणि  त्यातून  विद्यापीठाच्या फिया भरायचा. पण त्याने अभियांत्रिकी दीड वर्षात सोडून दिली आणि मशीन डिझाइनचा कोर्स केला. तो कोर्स करून त्याने मिनेसोटा मायनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत (म्हणजे नंतरच्या काळात 3M)   लॅब टेक्नीशियन म्हणून काम सुरू केले.तेव्हा ती कंपनी सॅन्डपेपर तयार करण्याच्या व्यवसायात होती.

एका दुपारी ड्र्यूला सँडपेपरच्या नवीन बॅचची चाचणी घ्यायची होती म्हणून त्याने  ऑटो बॉडी शॉपला भेट दिली. त्यावेळी टू-टोन (दोन रंग असलेल्या) मोटारी लोकप्रिय होती. तिथे प्रवेश करताच त्याने कामगारांचे बोलणे ऐकले. त्यांना रंग देताना मोटारीचा काही भाग मास्क म्हनजे झाकून ठेवावा लागत असे. मास्कींग्साठी जी टेप वापरायचे ती  काढल्यावर त्याखालचा पेंट सोलून बाहेर येत असे. त्यामुळे त्यांचे काम डबल व्हायचे आणि खर्चही वाढायचा. रिचर्ड ड्र्यूला ती समस्या कळाली आणि त्यातून त्याचे प्रयोग सुरू झाले.

पुढची दोन वर्षे त्याने अशी टेप तयार करण्यासाठी प्रयत्न केला जी चिकटवण्याचे काम करेलच पण जेव्हा काढावी  लागेल तेव्हा सहजपणे काढली जाईल. त्यासाठी त्याने वनस्पती तेलापासून ते झाडं,पानं या सर्वांवर प्रयोग केले. कंपनीचे कार्यकारी अधिकारी विल्यम मॅककाईट यांनी ड्र्यूला हे काम थांबवून स्वतःचे काम करण्याचा सल्ला दिला. पण ड्र्यू पण तितकाच टेप सारखाच  चिकट,त्याने वेळ काढून टेपचे प्रयोग  चालूव ठेवले.अखेरीस, १९२५  मध्ये त्याला एक यशस्वी फॉर्म्युला सापडला. क्रेप पेपरच्या मागे कॅबिनेट मेकरचा ग्लु ग्लिसरीनमध्ये मिसळून त्याने एक अनोखा टेप तयार केली.परंतु ती व्यवस्थित चिकटत नव्हती त्यामुळे तो अजून प्रयत्न करत राहिला आणि अखेर २७ मे १९३० ला त्याच्या मास्किंग टेपचे पेटंट मिळाले. 

अमेरिका तेव्हा महामंदीमध्ये बुडाली होती. नव्या उद्योगांना 'स्वतः सुधार करा आणि बनवा' (mend and make do) असा संदेश दिला जायचा. त्यावेळी लोकांनी अक्षरशः शेकडो  वेगवेगळ्या पध्दतीने स्कॉच टेपचा वापर केला.फाटलेल्या कपड्यांना दुरुस्त करण्यापासून ते दुधाच्या बाटल्याचे झाकण लावण्यासाठी टेपचा वापर व्हायचा. 3M कंपनीची टेप त्यावेळी खूप खपली आणि कंपनीला खूप मोठा आर्थिक फायदा झाला. रिचर्ड ड्र्यूला स्कॉच टेपवर काम थांबवण्यास सांगणारे अधिकारी विल्यम मॅककाईट तेव्हा 3M कंपनीचे अध्यक्ष होते. 
अभियंत्यांना त्यांच्या मनाप्रमाणे प्रयोग करू दिल्यास नवीन निर्मिती होऊ शकते आणि कंपनीसाठी ते खूप फायदेशीर ठरते हे त्यांच्या लक्षात आले. त्यातून मॅनेजमेंटचा एक नवा फंडा जन्माला आला.
"तुम्ही लोकांभोवती कुंपण घातले तर तुम्हाला मेंढरे मिळतात.त्यापेक्षा त्यांना प्रोत्साहन द्या." त्यांनी कामाचे १५ टक्के तास हे नवीन प्रयोग करण्यासाठी राखीव ठेवले. हाच  १५ टक्क्याचा फंडा कालांतराने सिलिकॉन व्हॅलीतही वापरला गेला.आजही गुगल आणि हेवलेट पॅकार्ड सारख्या कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना प्रयोग करण्यास मोकळा वेळ देतात.

ड्र्यूचा स्कॉच टेपचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्याला 3 M साठी प्रॉडक्ट्स फॅब्रीकेशन प्रयोगशाळेचे नेतृत्व करण्यासाठी प्रमुख म्हणून नियुक्त केले गेले.  जिथे नवीन कल्पना विकसित करण्यासाठी त्याला पूर्णपणे मोकळीक मिळाली. पुढे त्याने आणि त्याच्या टीमने नवनवीन प्रयोग करत तब्बल ३० पेटंट मिळवली. चेहऱ्यावरील मास्कपासून ते रस्त्यावरचे चिन्हे असलेले बोर्ड अश्या अनेक गोष्टी त्यांनी बनवल्या. 

रिचर्ड ड्र्यू १९६२ साली 3 M मधून निवृत्त झाला. वयाच्या ८१ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. २००७ मध्ये त्यांना मरणोत्तर नॅशनल इन्व्हेंटर्स हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले. आज सेंट पॉलच्या या ड्र्यूच्या मूळ गावी 3M कंपनीतीने एक पाटी लावली आहे, त्यात एका भागामध्ये असे लिहिले आहे “महामंदीच्या वेळी सर्वात गरज असलेल्या स्कॉच ट्रान्सपरंट टेपचा जनक. ज्याने अमेरिकन लोकांच्या गरजा ओळखून त्यांच्या वस्तू दीर्घकाळ टिकवण्यासाठी मदत केली"

रिचर्ड ड्र्यूचा हा शोध अनेक नवतरुणांना  प्रोत्साहन देणारा आहे. कामावर निष्ठा ठेवून नवीन कल्पना राबवणे हे त्याने दाखवून दिले. आज जगभरात 3M कंपनीचे अनेक गोष्टी विकल्या जातात. यात रिचर्ड ड्र्यू चा खूप मोठा हातभार आहे. त्यावेळेला कोणी कल्पनाही केली नसेल की एक बॅंजो वाजवणारा, कॉलेज ड्रॉपआउट मुलगा अमेरिकेच्या सर्वात मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये आयुष्याची जवळजवळ चार दशके घालवणार आहे आणि इतिहासामध्ये सर्वाधिक विकल्या जाणार्‍या आणि सर्वांत महत्त्वाच्या घरगुती उत्पादनांचा शोध लावेल.
त्याच्या कामगिरीला मनापासून सलाम.

आता बोभाटाच्या वाचकांसाठी एक खास माहिती. तुम्ही जरी स्कॉच टेपचा शोध लावला नसेल तरी चालेल पण फक्त  3 M कंपनीबद्दल थोडीशी माहिती वाचून ठेवली असती तर आजच्या तारखेस तुम्ही करोडपती झाला असता. ही  3M कंपनी बिर्ला उद्योगसमूहाच्या सोबत करार करून १९८७ साली भारतात आली. त्यानंतर या कंपनीचा पब्लीक इश्यू आला. समजा तुमचा जन्मच त्या सुमारास झाला असेल तर  या माहितीचा तुम्हाला काहीच उपयोग झाला नसता. पण समजा २०१३ हे समभाग तुम्ही घेतले असते तर आज तुमचे पैसे ८ पट झाले असते. आज हा लेख लिहिताना 3M चा बाजारभाव आहे २५७०० रुपये !!
हरकत नाही, बोभाटाचे असे विविध  मनोरंजक लेख वाचून कधीतरी तुम्हाला घबाड हाती लागणार आहेच !!

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required