इस्त्रोची अभूतपूर्व कामगिरी फत्ते : नासाला जमलं नाही ते आम्ही केलं!!

Subscribe to Bobhata

भारताची अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवलाय. आज या संस्थेनं एकाच रॉकेटमधून तब्बल १०४ उपग्रह अवकाशात सोडले...

हा एक जागतिक विक्रम आहे. या आधी रशियानं एकावेळी सर्वाधिक ३७ उपग्रह सोडले होते, तर अमेरिकेच्या नासाने २०. इस्त्रोच्या धृवीय उपग्रहाची (PSLV) ही ३९वी अंतराळवारी आहे. विशेष म्हणजे या १०४ पैकी १०१ उपग्रह हे अन्य देशांचे आहेत, जे व्यावसायिक तत्वावर इस्त्रोने लॉन्च केले.

आज सकाळी ९ वाजून  २८ मिनीटांनी हे उड्डाण यशस्वी करण्यात आलं.  इथंही तेच शक्तीशाली रॉकेट वापरण्यात आलं जे बहुचर्चित चांद्रयान आणि मंगळ मोहीमेत वापरण्यात आलं होतं. 

पून्हा एकदा भारतीयांच्या माना उंचावल्याबद्दल धन्यवाद...  इस्त्रो !!

भारतीयांची मान अभिमानाने उंचावी अशा इस्त्रोच्या सहा मोठ्या कामगिर्‍या

इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा : पाहा कसे सोडले २० उपग्रह आकाशात

इस्रो ने भारताच्या पहिल्या रियुजेबल स्पेस शटलची केली यशस्वी चाचणी

 

सबस्क्राईब करा

* indicates required