computer

पुण्याच्या मुलाने चंद्राचा आजवरचा सर्वात सुस्पष्ट फोटो मिळवलाय...त्याने हे कसं शक्य केलं?

देशात गुणी मुलांची कमी नाहीये हे अनेक उदाहरणातून सिद्ध झाले आहे. काही ना काही करत राहणे हा स्वभाव असला की अनेक मोठ्या गोष्टी निर्माण होऊ शकतात. लॉकडाऊनमध्ये अनेक मुले रिकामा वेळ व्हिडीओ गेम्स आणि इतर गोष्टीत खर्च करत असले तरी काही मुले या वेळेत भन्नाट गोष्टी देखील करत आहेत. 

पुण्याच्या १६ वर्षीय प्रथमेश जाजू या मुलाने मात्र थेट देशाला भुरळ घातली आहे. त्याने काय केले तर एक ध्यास घेतला आणि त्यासाठी स्वतःला झोकून दिले. त्यातून जे बाहेर आले ते निव्वळ अफलातून आहे. प्रथमेशने आजवरचा सर्वात सुस्पष्ट असा चंद्राचा मिळवला आहे. या कामासाठी त्याचं सगळीकडून कौतुक होत आहे. त्याने नेमकं काय केलंय, आजच्या लेखातून पाहूया.

प्रथमेशने ५०,००० पेक्षा जास्त फोटोंनंतर एक 3D फोटो तयार केला. यासाठी त्याला तब्बल १८६ गिगाबाईटचा डेटा खर्च झाला. प्रथमेशने काढलेल्या या भन्नाट फोटोची सगळीकडून स्तुती होत असली तरी या कामासाठी त्याने स्वताला ४० तास गुंतवून ठेवले होते. तो सांगतो की, हा फोटो म्हणजे दोन वेगवेगळ्या फोटोचे एक एचडीआर कम्पोसीट आहे. फोटोला 3D इफेक्ट यावा यासाठी त्याने हे केले.

या प्रक्रियेदरम्यान त्याने चंद्राचे जे फोटो मिळवले होते म्हणजे रॉ डाटा हा जवळपास १०० जीबी होता आणि जेव्हा त्याने याला प्रोसेस केले तेव्हा हा डेटा वाढून १८६ जीबी पर्यँत पोहोचला होता. हे सर्व त्याने परत एकत्र केले. जेव्हा हे एकत्र केले तेव्हा परत ६०० एमबी एवढा डेटा झाला. 

३ मे ला त्याने दुपारी २ वाजेता फोटो घेतला. फोटोसोबत त्याने चंद्राचे काही व्हिडीओही घेतले. यासाठी पुढे ४ तास त्याने त्यावर प्रक्रियेवर केली. पुढे ५०,००० फोटो काढण्यात त्याने तब्बल ४० तास खर्च केले. पण जोवर परफेक्ट शॉट येत नाही तोवर थांबायचे नाही हे पठ्ठ्याने ठरवून टाकले होते. शेवटी त्याने अचूक प्रक्रिया करत या सर्वांना एकत्र केले आणि चंद्राचा सुस्पष्ट फोटो काढून दाखवला. 

प्रथमेश सध्या हे सर्व फक्त छंद म्हणून करत आहे. त्याची आवड ऍस्ट्रोफिजिक्स असल्याने यातच त्याला करियर देखील करायचे आहे. छंद म्हणून जर हा भाऊ इतके छान काम करून दाखवत असेल तर त्याने जर या क्षेत्रात प्रशिक्षण घेतले तर तो अजून काय काय नाही करू शकत नाही का?

प्रथमेशच्या कामाचं बोभाटा तर्फे अभिनंदन!!

सबस्क्राईब करा

* indicates required