वाचा भरपगारी रजेची सुरवात कशी झाली?

दरवर्षी नवं कॅलेंडर आलं की लगेच शनिवार-रविवारला जोडून किती सुट्या आहेत आणि किती रजा घेतल्यावर आठवड्याभराची सुटी घेता येईल याचे मेसेजेस  व्हॉट्सऍपवर फिरायला लागतात. आताच नाही, तर खूप आधीपासून लोक सुट्या आणि भरपगारी रजेची वाट बघत असतात. 

गावखात्यात नोकरी, नोकरी कसली म्हणा -रोजंदारी करणार्‍याला सरकारी नोकरी किंवा कायमची नोकरी करणार्‍याचा नेहमी हेवा वाटत असतो.  कायम नोकरी करणार्‍याला आठवड्याच्या रजा आणि इतर रजा हक्काने मिळतात. कॅज्युअल लिव्ह (नैमित्तिक रजा-विशेष नैमित्तिक रजा), प्रिव्हीलेज लिव्ह-(विशेष हक्काची रजा ),  होम टाऊन लिव्ह-(गावी जाण्याची रजा), मॅटर्नीटी लिव्ह -(बाळंतपणाची रजा)  अशा भारी भारी पूर्ण पगारी  रजा  हक्काने मिळतात. रोजंदारी करणार्‍याला रजा म्हणजे बिनपगारी रजा हा एकच पर्याय असतो.


पण ही भरपगारी रजा आली कोठून? हे समजायचं असेल तर इतिहासातल्या १७५२ सालापर्यंत मागं जावं लागेल. १७५२ साली इंग्लंडच्या राजाने त्यावेळी चालू असलेल्या रोमन -ज्युलीअन कॅलेंडरचा वापर बंद केला. आणि आता ग्रेगोरीअन कॅलेंडरचा वापर करण्याचं ठरवलं. या दोन प्रकारच्या कॅलेंडरच्या कालगणनेत सप्टेंबर महिन्यात ११ दिवसांचा फरक होता. आता हा फरक घालवण्यासाठी इंग्लंडच्या राजानं एक फतवा काढून कॅलेंडरमधून अकरा दिवस चक्क रद्दच करून टाकले. अर्थातच तो सप्टेंबर महिना ११ दिवस लवकर संपला आणि पगार मात्र पूर्ण महिन्याचा मिळाला. अशी सुरुवात झाली भरपगारी रजेची !!!

सबस्क्राईब करा

* indicates required