computer

पक्ष्यांची हाडे पोकळ का असतात ? शाळेत शिकावतात त्यापेक्षा उत्तर फारच वेगळं आहे !!

पक्ष्यांची हाडे पोकळ का असतात या प्रश्नाला फार पूर्वीपासून एकच उत्तर दिलं जातं. ते म्हणजे पक्ष्यांना पोकळ हाडांमुळे उडण्यास मदत होते. हे छापील उत्तर बाजूला ठेवून आपण आज थोडी वेगळी माहिती घेणार आहोत.

पोकळ हाडांमुळे पक्ष्यांचं वजन कमी राहतं आणि त्यांना उडण्यास मदत होते हे काही प्रमाणात खरं असलं तरी पूर्ण सत्य नाही. पक्ष्यांना मोठ्याप्रमाणात ऑक्सिजन लागतं म्हणून त्यांची हाडे पोकळ असतात. पक्ष्यांच्या हाडांच्या आतलं हे चित्र पाहा.

श्वसनाचा आणि हाडांचा काय  संबंध आहे ?

पक्ष्यांच्या हाडांमध्ये हवा खेळती राहील अशी पूर्ण व्यवस्था असते. कशी ते समजून घेऊया. पक्ष्यांची जसजशी वाढ होते तसतशी त्यांचं फुफ्फुसंच विस्तार होऊन हाडांमध्ये पोकळी निर्माण होत जाते. पूर्ण वाढ झाल्यांनतरही हाडांशी फुफ्फुसं जोडलेली राहतात. त्यामुळे हाडांच्या पोकळीतून सुद्धा पक्ष्यांना श्वास घेता येतो. 

पक्ष्यांना याचा खूपच फायदा होतो. जलद गतीने उडण्यासाठी जेव्हा त्यांना जास्तीतजास्त श्वासाची गरज पडते तेव्हा ते हाडांच्या मार्फत ऑक्सिजन घेऊ शकतात. म्हणजे एकीकडे नाकावाटे श्वासोच्छवास सुरु असताना हाडांमधून पण श्वसन सुरु राहतं.

पक्ष्यांची हाडे पोकळ असली तरी त्यामुळे पक्ष्यांचं वजन कमी होत नाही. याचं कारण म्हणजे, हाड जर पोकळ  असेल तर ते मोडण्याची भीती असते. म्हणून निसर्गाने पक्ष्यांना अशा प्रकारची हाडे दिली आहेत जी मजबूतही असतात आणि ज्यांचा दुहेरी फायदा पण असतो.

सबस्क्राईब करा

* indicates required