म्हणून नवीन माणसाचा चेहरा लक्षात राहातो, नाव नाही....

आपण जेव्हा नवीन व्यक्तीला भेटतो तेव्हा त्याचं नाव लक्षात का राहत नाही भाऊ ? नवीन व्यक्ती, चेहरा लक्षात राहिला पण नाव लक्षात राहतच नाही. का ? आपण विसरभोळे असतो म्हणून ? आपलं लक्ष नसतं म्हणून की आपण नाव लक्षात ठेवायला आळशीपणा करतो म्हणून ? छे ओ....याचं सर्वस्वी कारण आहे तुमचा मेंदू !!

मेंदू आणि नावांचा घोळ

स्रोत

तुमचा मेंदूचं असतो जो घोळ घालतो. एका अभ्यासानुसार जेव्हा आपण नवीन व्यक्तीला भेटतो आणि ती व्यक्ती आपल्याला नाव सांगते तेव्हा आपलं लक्ष तो काय बोलतोय याकडे नसून आपण काय बोलणार आहोत यावर जास्त असतं. म्हणजे त्याने नाव सांगितल्यानंतर आपण पुढे स्वतःचं नाव कसं सांगायचं याच्या तयारीत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा नवीन माणसाचं नाव आपल्याला समजतं तेव्हा ते नाव त्याबरोबर कोणतीही नवीन माहिती घेऊन येत नसल्याने मेंदू त्याला काही सेकंदापेक्षा जास्त काळ लक्षात ठेवत नाही.

आता तुम्हाला प्रश्न पडेल की नवीन माणसाचा चेहरा आपल्या लक्षात कसा राहतो ? त्याचं काय आहे ना. प्रत्येक माणसाचा चेहरा हा वेगळा असतो. जेव्हा आपण एखाद्या नवीन व्यक्तीला बघतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील बारीक सारीक गोष्टी आपल्या दृश पटलावर छापल्या जातात. त्यांमुळे होतं काय की त्या व्यक्तीला पुन्हा भेटल्यावर आपल्याला ती व्यक्ती ओळखीची आहे हे समजतं पण नाव लक्षात राहत नाही.
 

नाव लक्षात कसं ठेवाल ?

स्रोत

एखाद्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवायचं असेल तर सर्वात आधी तुम्ही त्याच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष दिलं पाहिजे. जर तुम्हाला असं वाटलं की तुमचं लक्ष नव्हतं तर तुम्ही त्याला त्याचं नाव पुन्हा एकदा सांगण्याची विनंती करू शकता.

नावाबरोबर व्यक्तीला जोडण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ‘सचिन’ नाव असेल तर त्या नावा बरोबर त्या व्यक्तीची खुण लक्षात ठेवा. किंवा त्या व्यक्तीचं नाव मनात दोन तीन वेळा वारंवार आणा.

तुम्ही जसं दुसऱ्यांच नाव लक्षात ठेवत नाही तसचं तुमचंही नाव लोक लक्षात ठेवत नसतील. यासाठी तुम्ही स्वतःबद्दल इतक्या चांगल्या पद्धतीने सांगा की समोरच्या व्यक्तीला तुमचं नाव लक्षात राहीलंच पाहिजे.  

पुढच्या वेळी नव्या व्यक्तीला भेटताना हे जरूर लक्षात ठेवा.

सबस्क्राईब करा

* indicates required