computer

भारतीय ऑलिम्पिक खेळाडूंना यशाच्या शिखरापर्यंत नेणारे १० प्रशिक्षक....

भारतीय खेळाडूंनी यावेळी अतिशय चांगली कामगिरी करत आजवरच्या इतिहासात सर्वाधिक पदके मिळवली आहेत. नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकत संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशा पद्धतीने ऑलिम्पिकचा शेवट केला आहे. या खेळाडूंची मेहनत खऱ्या अर्थाने मोठी होती. त्याचवेळी त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांचे योगदान नाकारता येणार नाही. आज आपण याच प्रशिक्षकांबद्दल जाणून घेणार आहोत.

१. क्लॉस बार्तोनित्ज

बार्तोनित्ज हे भारतासाठी एथलेटिक्समध्ये आजवरच्या इतिहासात पहिले सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचे प्रशिक्षक आहेत. मूळ जर्मनीचे असलेले बार्तोनित्ज गेली दोन वर्षे नीरजला प्रशिक्षण देत आहेत. नीरजच्या प्रवासाचे साक्षीदार असण्याबरोबर त्याच्या यशात त्यांचा पण वाटा आहे असे म्हणावे लागेल. 

२. सतपाल सिंग

कुस्तीत रौप्यपदक मिळवणाऱ्या रवी पुनियाचा प्रवास अतिशय खडतर होता. रवीने पदक मिळवल्यावर सर्व स्तरातून त्याचे कौतुक होऊ लागले. सतपाल सिंग यांनी रवीला वयाच्या १० व्या वर्षापासून प्रशिक्षण दिले आहे. सतपाल सिंग हे देखील आधी कुस्तीपटू होते. त्यांचे पदक मिळवण्याचे स्वप्न रवीने पूर्ण करून दाखवले आहे. 

३. विजय शर्मा 

भारताला यावेळच्या ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवून देणाऱ्या मीराबाई चानूला विजय शर्मा यांनी प्रशिक्षण दिले आहे. २०१४ पासून ते त्याला प्रशिक्षण देत आहेत. शर्मा यांना त्यांच्या कामासाठी द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०१२ पासून ते इंडियन वेटलिफ्टिंग असोसिएशनचे राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत. 

४. संध्या गुरंग 

पूर्ण देशाप्रमाणे लवलीना बोर्गोहेनने देशासाठी कास्यपदक जिंकल्यावर प्रशिक्षक गुरंग यांना पण प्रचंड आनंद झाला आहे. गुरंग यांचा प्रवास थक्क करणारा आहे. पॅरालिसिसमधून बाहेर पडून त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंग खेळाडू अशी ओळख मिळवली होती. २००८ साली त्यांनी शेवटचे सुवर्णपदक जिंकले आणि २०१० पासून त्यांनी खेळाडूंना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.

५. पार्क ते संग

पी व्ही सिंधुदुर्ग सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. तिच्या या यशाचे श्रेय तिने तिची कोरियन प्रशिक्षक पार्क ते संग यांना दिले आहे. २०१९ पासून त्या सिंधूला प्रशिक्षण देत आहेत.

६. ग्रॅहम रेड 

भारतीय पुरुष हॉकी संघाने तब्बल ४२ वर्षांनंतर इतिहास घडवला. या खेळाडूंना प्रशिक्षण देणारे रेड ऑस्ट्रेलियन हॉकी संघात खेळाडू होते. १९९२ साली कांस्यपदक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचे ते भाग होते. २०१९ सालापासून ते भारतीय पुरुष हॉकी संघाला प्रशिक्षण देत आहेत. भारतीय खेळाडूंबरोबर त्यांचे पण कौतुक करायला पाहिजे.

७. जोएर्ड मरीन 

भारतीय महिला हॉकी संघाने कांस्यपदकाची लढाई जरी जिंकली नसली तरी या मुलींनी मारलेली मजल पूर्ण देशाला सुखावून गेली. हा प्रवास पुढच्यावेळी पदकावर पोहोचायला पाहिजे ही प्रत्येकाची इच्छा आहे. या प्रवासात प्रशिक्षण म्हणून मरीन यांचा पण मोठा वाटा आहे. ते मूळ उत्तर ब्राबंटचे आहेत. गेली चार वर्षे म्हणजे फेब्रुवारी २०१७ पासून ते भारतीय महिला हॉकी संघाला प्रशिक्षण देत आहेत.

८. राखी त्यागी

कमलप्रीत कौरचे पदक जरी थोडक्यात हुकले तरी तिने मात्र देशवासीयांचे मन मात्र जिंकले आहे. राखी त्यागी २०१४ पासून कमलप्रीतला प्रशिक्षण देत असून तिच्या इथवरच्या यशात त्यांचा पण वाटा आहे हे मान्य करायला हवे.

९. मुराद गायदारोव 

चीनच्या झुशेन लीनला क्वार्टर फायनलमध्ये हरवल्यावर दीपक पुनियाने भारतीयांच्या आशा वाढवल्या होत्या. पण कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात त्याला हार पत्करावी लागली. मुराद यांनी पुनियाला घडवण्यासाठी गेली दोन वर्षे  मेहनत घेतली होती. ते स्वतः २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते. यावेळी थोडक्यात पदक गेल्याने दीपक पुनिया पुढच्यावेळी पदक खेचून आणेल अशी आशा आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required