५ खेळाडू जे मोडू शकतात सचिनचा सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम..

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रमाचा जेव्हा उल्लेख होतो, त्यावेळी सचिन तेंडुलकर हे नाव सर्वोच्च स्थानी असते. सचिन तेंडुलकरने वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. तसेच सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम देखील सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना प्रत्येक खेळाडूचे स्वप्नं असते की, त्याने आपल्या देशासाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळावे. सचिन हा एकमेव खेळाडू आहे ज्याने २०० कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान असे काही खेळाडू आहेत, जे सचिनचा सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम मोडू शकतात.

जेम्स अँडरसन (James Anderson) : 

इंग्लंड संघाचा दिग्गज खेळाडू जेम्स अँडरसन याने आतापर्यंत एकूण १७२ कसोटी सामने खेळले आहेत. जेम्स अँडरसन सध्या ३९ वर्षांचा आहे. मात्र त्याचा फिटनेस आणि गोलंदाजीचा फॉर्म पाहता तो आणखी काही वर्ष क्रिकेट खेळू शकतो. त्यामुळे जेम्स अँडरसन सचिन तेंडुलकरचा २०० सामने खेळण्याचा विक्रम मोडू शकतो.

विराट कोहली (Virat Kohli):

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने आतापर्यंत १०१ कसोटी सामने खेळले आहेत. या कसोटी सामन्यांमध्ये त्याने ८०४३ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला २०० कसोटी सामने खेळण्यासाठी अजूनही ९९ सामन्यांची आवश्यकता आहे. तो सर्वात फिट खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे त्याची फिटनेस पाहता तो वयाच्या ४० व्या वर्षीपर्यंत क्रिकेट खेळू शकतो. तो आता ३३ वर्षांचा आहे. 

जो रूट (Joe root) : 

इंग्लंड संघाचा माजी कर्णधार जो रूट याने आतापर्यंत एकूण १२१ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने १०४५८ धावा केल्या आहेत. तो सध्या ३१ वर्षांचा आहे. त्यामुळे तो सचिन तेंडुलकरचा २०० कसोटी सामना खेळण्याचा विक्रम मोडण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. जो रूट कसोटी क्रिकेटला प्रथम प्राधान्य देतो त्यामुळे जो रूट सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडू शकतो.

स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) :

जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांची जोडी कसोटी क्रिकेटमधील एक दिग्गज खेळाडूंची जोडी आहे. स्टुअर्ट ब्रॉड ३५ वर्षांचा आहे. त्याने आतापर्यंत एकूण १५३ कसोटी सामने खेळले आहेत. स्टुअर्ट ब्रॉड देखील जेम्स अँडरसन प्रमाणेच कसोटी क्रिकेटवर अधिक भर देतो. त्यामुळे स्टुअर्ट ब्रॉड देखील सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडू शकतो.

नाथन लायन (Nathon lyon):

ऑस्ट्रेलियाचा ३४ वर्षीय फिरकी गोलंदाज नाथन लायन देखील कसोटी क्रिकेटवर अधिक भर देतो. त्याने १०८ कसोटी सामने खेळत ४२७ गडी बाद केले आहेत. जर त्याने आपल्या फिटनेसवर अधिक भर दिला तर, तो २०० कसोटी सामने खेळू शकतो.

काय वाटतं? यापैकी कोणता खेळाडू सचिनचा कसोटी क्रिकेटमध्ये २०० सामने खेळण्याचा विक्रम मोडू शकतो? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required