computer

ऑलिंपिकमध्ये वाजलेल्या राष्ट्रगीतामुळे २५ वर्षांनंतर अन्नू मलिकची चोरी कशी उजेडात आलीय?

सोशल मीडियामुळे आजच्या गोष्टी बाहेर येतात असे नाही. तुम्ही केलेली एखादी जुनी कोणतीही गोष्ट तुम्हाला अडचणीत आणू शकते. सध्या इस्त्रायलने जिंकलेल्या सुवर्णपदकामुळे भारतीय संगीतकार अन्नू मलिक ट्रोल होत आहे. तुम्ही म्हणाल या इस्त्रायलच्या सुवर्णपदकाचा आणि अन्नू मलिकचा काय संबंध? पुढची गोष्ट वाचा म्हणजे सर्वकाही कळेल...

रविवारी टोक्यो ऑलिम्पिकमधील आपले पहिलेवहिले सुवर्णपदक जिंकले. त्यांचा खेळाडू अर्तम दोल्गोपीयात याने आर्टिस्टिक जिमनॅस्टिक खेळात सुवर्णपदक जिंकले. प्रथेप्रमाणे तो जेव्हा पदक घेण्यासाठी उभा राहिला तेव्हा त्याच्या देशाचे राष्ट्रगीत सुरू झाले. इस्त्रायलचे राष्ट्रगीत हैतिक्वा टोक्योत सुरू झाले आणि देशात अन्नू मलिक अडचणीत आला.

आता ज्या लोकांनी इस्त्रायलचे राष्ट्रगीत ऐकले त्यांना ही धून कुठेतरी ऐकली असल्याचे जाणवले. लोकही भन्नाट असतात. त्यांनी हे शोधूनही काढले की ही धून आणि अन्नू मलिकने संगीत दिलेले १९९६ सालचा सिनेमा 'दिलजले'मधील गाणे 'मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन' या गाण्याची धून ही सारखी निघाली.

आजवर आपण दर स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाला हे गाणे ऐकत आलो. पण तब्बल २५ वर्षांनी या गाण्याचे संगीत चोरीचे असल्याचे लोकांच्या लक्षात आले. अन्नू मलिक लगेच नेटकऱ्यांच्या निशाणावर आला. लोकांनी सपाटून त्याला ट्रोल केले.

अन्नू मलिकने यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न करत आपल्या आईचे काही दिवसांपूर्वी निधन झाले असल्याने आपण या विषयावर बोलू इच्छित नाही, असे वक्तव्य केले. मात्र या गाण्याचे संगीत चोरलेले नाही किंवा कसे याबद्दल काही तो बोलला नाही. शेवटी त्याची चोरी २५ वर्षांनी उजेडात आली . यावरून सध्याच्या जमान्यात एखाद्याला कितीही जुनी गोष्टी अडचणीत अणू शकते हे सिद्ध होते.

तशी भारतीय सिनेमांतली कित्येक प्रसिद्ध गाणी उचलेगिरी करून आणलेली आहेत, पण जोवर सापडत नाही तोवर ते संगीताचे बादशहाच, नाही का?

सबस्क्राईब करा

* indicates required