मुंबई इंडियन्ससाठी देवाचा धावा करणार्‍या या आजीबाई आहेत तरी कोण ?

काय भाऊ, फायनल बोले तो और क्या चाहीये! एकदम काट्याची टक्कर. आणि त्यात फायनलीस्ट कोण? पुणे विरूद्ध मुंबई? मग तर महायुद्ध होणारच होतं. आणि ते झालंच! दोन्ही संघातही आणि दोन्ही संघाच्या चाहत्यांमध्येही... 

मॅच तर एकदम काट्याची झाली भाऊ. मॅचच्या आधी मुंबईची हवा, मग प्रत्यक्ष मॅच मध्ये पुण्याचं वादळ, अगदी १५ ओव्हर्स पर्यंत मॅच पुण्याच्या खिशात... आणि शेवटच्या ५ षटकांमध्ये आयपीएलची ट्रॉफी चक्क मुंबई इंडियन्सच्या हातात. आपण सारी मॅच जिव मुठीत घेऊन बघीतली, आणि त्यात दिसली ती मुंबईची सुपरफॅन आजी.

चाहत्यांमध्ये बसलेल्या या आजीबाईंनी मुंबईच्या विजयासाठी डोळे मिटून देवाचा धावा सुरू केला होता. कॅमेराही परत परत डोळे मिटून बसलेल्या या आजींवरूनच फिरत होता. बघता बघता मॅच पुण्याच्या हातातून मुंबईच्या हातात गेली आणि मुंबई तिसर्‍यांदा आयपीएलची विजेता ठरली.

आता सोशल मिडीयावर या आजींची चर्चा रंगलीय. मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी या आजीबाईंच्या प्रार्थनाच कामी आल्या असं लोकांचं म्हणनं आहे. पण या आजी कोण होत्या बरं? शोध लागलाय राव ! या आजी म्हणजे दुसर्‍या तिसर्‍या कोणी नसुन साक्षात नीता अंबानींच्या मातोश्री आहेत !! यांचं नाव आहे पुर्णिमाबेन दलाल.

फायनल मॅच बघायला आलेल्या पुर्णिमाबेन मुंबईसाठी जणू लकी चार्म ठरल्या आहेत. लहान मुलं आणि वृध्द लोकांचं देव जरा लवकर ऐकतो म्हणतात ते खरं की काय !! 

सबस्क्राईब करा

* indicates required